आमदार राणे-रुपाली पाटील यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

परळी वैजनाथ (जि. बीड) : आमदार नितेश राणे व रुपाली पाटील यांच्यातील कथित संभाषणाच्या क्लिपवरुन दोघांविरोधात शनिवारी (ता.4) पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. आमदार नितेश राणे व रुपाली पाटील यांच्यातील कथित संभाषणात परळी येथील आंदोलक सरकारकडे पैसे आणि महामंडळाची मागणी करीत असल्याचा उल्लेख आहे. 

सदर क्लिप शुक्रवारी (ता.3) सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने याची मोठी चर्चा झाली. दरम्यान, हे बदनामीचे षड्यंत्र असून, आंदोलन स्थगित करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. समाजातील प्रतिमा मलीन करण्यासह समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी हा प्रकार केला आहे. यामुळे माझ्यासह कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याचे मोर्चा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी म्हटले. या विषयाचे पुरावे असतील तर समाजासमोर ठेवावेत, पोलिस प्रशासनाने या सर्व प्रकरणाची चौकशी करून रूपाली पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करावी. तसेच पोलिस संरक्षणाची मागणीही करण्यात आली.

दरम्यान, जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि आरक्षणाचा ठोस निर्णय हेाईपर्यंत मेगा भरती थांबवावी यासाठी आंदोलने सुरुच आहेत. परळी येथील ठिय्या आंदोलनाचा अठरावा दिवस आहे. 

Web Title: FIR Registered against MLA Rane and Rupali Patil