Cotton Ginning Fire : कापसाच्या जिनिंगला आग; सुमारे सव्वादोन कोटीचे नुकसान

खामगाव फाटा येथे असणाऱ्या राजेंद्र फायबर या कापसाच्या जिनिंगला सोमवारी आग लागल्याची घटना घडली.
Fire at cotton ginning
Fire at cotton ginningsakal
Updated on: 

फुलंब्री - फुलंब्री तालुक्यातील खामगाव फाटा येथे असणाऱ्या राजेंद्र फायबर या कापसाच्या जिनिंगला सोमवारी (ता.३१) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर अग्निशमन यंत्रणेने पाच तासानंतर आग आटोक्यात आणली. मात्र यात सुमारे दोन हजार सातशे क्विंटल कापूस जळाल्याने सव्वादोन कोटी रुपयांचे जिनिंग मालकाचे नुकसान झाले आहे.

फुलंब्री तालुक्यातील खामगाव फाटा येथे मागील गेल्या अनेक वर्षापासून कापसाची जिनिंग आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शासकीय खरेदी देखील याच केंद्रावर केली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या जिनिंग वर कापूस होता.

गुढीपाडवा आणि रमजान ईद या दोन्ही सणानिमित्त कर्मचाऱ्यांची दोन दिवसापासून संख्या कमी होती. त्यामुळे जिनिंग हे गठन तयार करण्यासाठी सातत्याने सुरू राहत होते. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान जिनिंग मधील हॉट बॉक्स असणाऱ्या परिसरात अचानक आग लागली.

आग लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कापूस बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाऱ्याच्या झोतात आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे या घटनेची तात्काळ वडोद बाजार पोलिसांना माहिती देण्यात आली. वडोद बाजार पोलिसांनी सिल्लोड येथील अग्निशमन यंत्रणेला माहिती दिली.

मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन नियंत्रणेला पाचारण करण्यात आले. साडेनऊ वाजता अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत लोकल टँकर व जिनिंग मधील फायर याच्यामध्ये आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न कर्मचारी करीत होते.

परंतु अग्निशमन नियंत्रणाची गाडी पाचारण झाल्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे दीड वाजता सदरील आग आटोक्यात आली. तब्बल पाच तास आगे मध्ये 2 हजार सातशे क्विंटल कापूस जळून खाक झाला. यामध्ये जिनिंग मालकाचे सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांची नुकसान झाले आहे.

पाच तासानंतर आग आटोक्यात

राजेंद्र फायबर या कापसाच्या जिनिंगला सकाळी साडेआठ वाजता आग लागल्यानंतर खाजगी लोकल टँकरच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र आग आटोक्यात आली नाही. त्यानंतर अग्निशमन यंत्रणा आल्यानंतरही तब्बल पाच तास आग नियंत्रणात आली नाही.

वडोद बाजार पोलिसांची घटनास्थळाची पाहणी

खामगाव फाटा येथील राजेंद्र फायबर जिनिंग आणि वडोद बाजार पोलीस ठाणे हे दोन्ही हाकेच्या अंतरावर आहे. ही घटना घडल्यानंतर वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या पथकाने जिनिंगची तात्काळ संपूर्ण पाहणी केली. ही घटना घडली त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन यंत्रणेला बोलावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फुलंब्रीत अग्निशमन यंत्रणा कधी कार्यान्वित होणार

फुलंब्री तालुका होऊन तब्बल 25 वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. या पंचवीस वर्षाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात तालुक्यात आगीच्या घटना घडलेल्या आहे. परंतु अजूनही अग्निशमन यंत्रणा पूर्ण क्षमतेने तालुक्यात कार्यरत नाही. त्यामुळे अग्निशमन यंत्रणा कधी कार्यान्वित होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

दोन हजार सातशे क्विंटल कापूस जळाला

राजेंद्र फायबर जिनिंग वर मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे कापसाचे गठन तयार करण्याचे काम सुरू होते. सुमारे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे क्विंटल कापूस जिनिंगच्या परिसरात होता. हा पूर्ण जळाल्यामुळे आठ हजार रुपये क्विंटल दराने दोन कोटी 24 लाख रुपयांचे नुकसान जिनिंग मालकाचे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com