औरंगाबादेत नगररचना विभागाच्या रेकॉर्ड रुमला आग 

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 6 जून 2019

कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची अतिशय महत्वाची दस्तावेज ठेवण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील ठिकाण असलेल्या नगररचना विभागास गुरुवारी (ता.सहा) सकाळी साडेनऊ वाजता आग लागल्याची घटना घडली. कर्मचाऱ्यांनी वेळीच अन्य फाईली इतरत्र हालवल्या. दरम्यान, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत ही आग नियंत्रणात आणली. 
 

औरंगाबाद - कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची अतिशय महत्वाची दस्तावेज ठेवण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील ठिकाण असलेल्या नगररचना विभागास गुरुवारी (ता.सहा) सकाळी साडेनऊ वाजता आग लागल्याची घटना घडली. कर्मचाऱ्यांनी वेळीच अन्य फाईली इतरत्र हालवल्या. दरम्यान, अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत ही आग नियंत्रणात आणली. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या नगर रचना विभागास सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागल्याची बाब अग्निशामन दलास देण्यात आली. वेळीच धाव घेत अग्निशमन दलाने तासाभरात ही आग आटोक्‍यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. प्रारंभी, ही बाब निदर्शनास आल्यानंतर शिपाई चंद्रकांत भालेराव यांनी अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने कार्यालयात असलेल्या छोट्या अग्निशमन यंत्राने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, धुरांचे लोळ वाढत असल्याने त्यांनी आपत्ती निवारणचे अधिकारी अजय चौधरी यांना ही माहिती दिली.

चौधरी यांनी अग्निशमन दलास पाचारण केले. घटनास्थळी जवान दाखल होताच खिडक्‍यांच्या काचा फोडत पाण्याचा मारा केला. एक तासाच्या परिश्रमानंतर आग आटोक्‍यात आणली. आग नेमकी कशाने लागली, की कुणी लावली, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. घटनास्थळी महापौर नंदकुमार घोडेले, अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निलेश श्रींगी, नगररचना विभागाचे अधिकारी सोनवणे यांनी धाव घेत पाहणी केली. यात नेमके कशाकशाचे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire in Aurangabad Nagarpalika record room