उमरगा : बगॅसच्या साठ्याला भीषण आग

अविनाश काळे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

उमरगा : तालुक्यातील जकेकूर परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील सागर अॅग्रोटेक कंपनीत प्लायवुड तयार करण्यासाठी लागणाऱ्या बगॅसच्या साठ्याला मंगळवारी (ता. 16) पहाटे तीनच्या सुमारास  भीषण आग लागल्याने प्राथमिक अंदाजानुसार पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले. आगीचा प्रकार वीज पडून झाल्याने अंदाजे 16 हजार टन बगॅसचे पुट्टे जळून खाक झाले. 

सोमवारी (ता. 15) दिवसभर उन्हाची दाहकता होती. रात्री वाऱ्याचा प्रवाह सुरू होता. मध्यरात्री बारानंतर काही भागात वारा, विजांचा कडकडाट सुरू होता. औद्योगिक वसाहतीतील गोविंदभाई पटेल यांच्या सागर अॅग्रोटेक कंपनीत ऊसाच्या बगॅसपासून प्लायवुड तयार केले जाते. त्यासाठी राज्यातील विविध भागातील साखर कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात बगॅसची आवक करण्यात आली होती. खुल्या बगॅसचे पुट्टे तयार करून मोठया प्रमाणात 21 एकर क्षेत्रात  साठवून  ठेवण्यात आले होते. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास बगॅसवर वीज पडून आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीची आग आटोक्यात आणण्याची यंत्रणा आहे, त्यामार्फत पहाटेपर्यंत प्रयत्न सुरू होते, परंतु आगीमुळे वायर, पाईप जळाल्याने ती बंद पडली. सकाळी आठ वाजता ती यंत्रणा सुरु झाली.

या दरम्यानच्या काळात मुरूम, निलंगा, तुळजापूर, व औसा येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या यंत्रणेकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र आगीचा डोंब भयानक असल्याने तेथंपर्यंत पाण्याचा मारा पोहचत नव्हता. तरीही अलीकडची बाजू सुरक्षित राहावी यासाठी प्रयत्न सुरू होते. दोन ते तीन जेसीबी मार्फत बगॅसचे ढिगारे खुले करण्यात येत होते. 

Web Title: fire to bugas at umarga