नांदेडात पुन्हा गोळीबार

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

सोमवारी (ता. नऊ) रात्री बाफना परिसरात एका व्यावसायीकावर पुन्हा गोळीबार करण्यात आला. यात मात्र कुठलीही जीवीत हाणी झाली नाही. या प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूध्द मंगळवारी (ता. १०) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नांदेड : शहरात मागील काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनांवर पोलिसांनी नियंत्रण मिळविले होते. एवढेच नाही तर एक गुन्हेगार पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला होता. आता शहर व जिल्हा शांत राहिल असा निश्‍व: स पोलिसांनी टाकला होता. मात्र सोमवारी (ता. नऊ) रात्री बाफना परिसरात एका व्यावसायीकावर पुन्हा गोळीबार करण्यात आला. यात मात्र कुठलीही जीवीत हाणी झाली नाही. या प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूध्द मंगळवारी (ता. १०) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

बाफना परिसरात ड्रायव्हींग स्कुल चालक इंद्रपालसिंग भाटीया हे आपल्या दशमेशनगर भागातील आरतीया कॉम्पलेक्समधील कार्यालयात सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे बसले होते. यावेळी तोंडावर पट्टी बांधून दोघेजण त्यांच्याजवळ आले. ‘भाई का फोन क्यु नही उठाते’ म्हणून त्यांनी हवेत पिस्तुलातून गोळीबार केला. यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. या घटनेनंतर भाटीया हे भयभीत झाल्याने त्यांनी हा गंभीर प्रकार पोलिसांना कळविला नाही. त्यांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला नाही. मात्र मंगळवारी (ता. १०) सकाळी त्यांनी इतवारा पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. 

हेही वाचा -- ‘फिटनेस’साठी नांदेडकरांची पीपल्सवर गर्दी

वरिष्ठ पोलिस अधिकार घटनास्थळी

पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, इतवारा पोलिस ठाण्याचे प्रदीप काकडे, वजिराबाद पोलिस ठाण्याचे संदीप शिवले यांनी घटनास्थळ गाठले. परिसराची पाहणी केली. यानंतर गोळीबार झाल्याचे अन्य व्यापाऱ्यांना समजले. त्यांच्य दहशतीचे वातावरण पसरले आहे. यानंतर इंद्रपालसिंग भाटीया यांच्या फिर्यादीवरुन अनोळखी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एकदा वाचाच-- कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

नागरिकांनी भयभीत होऊ नये

हा प्रकार श्री. भाटीया यांनी रात्रीच सांगितला असता तर नाकाबंदी करून आरोपींच्या मुसक्या आवळता आल्या असत्या. मात्र त्यांनी रात्री पोलिसांना का सांगितले नाही हे मात्र समजु शकले नाही. मागील काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनावर पोलिसांनी नियंत्रण मिळविले होते. फरार व पाहिजे आरोपींच्या मुसक्या आवळून अनेकांना कारागृहात टाकले आहे. नांदेड पोलिसांची धास्ती गुन्हेगारी जगतातील लोकांनी घेतली असली तरी या घटना पुन्हा घडू नये व व्यापाऱ्यांनी पोलिसांना वेळेत कळवावे असे आवाहन श्री. मगर व श्री. राठोड यांनी केले आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Firing again in Nandeda