
हिंगोली जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याप्रमाणे बुधवारी (ता. २३) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
हिंगोली : जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याप्रमाणे बुधवारी (ता. २३) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
हेही वाचा - दक्षिण भारतातील प्रसिध्द माळेगाव यात्रा अखेर रद्द, देवसवारी निघणार
असा आहे निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा ता.२३ ते ३० डिसेंबरपर्यंत वेळ सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत (२५,२६ व २७ डिसेंबरची सार्वजनिक सुटी वगळून). नामनिर्देशनपत्र छाननी करण्यास गुरुवारी ता.३१ सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्यास सोमवारी (ता.चार) जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यास देखील हाच दिवस आहे. आवश्यक असल्यास मतदानाचा शुक्रवारी ता.१५ जानेवारी, २०२१ सकाळी ७.३० पासून ते सायंकाळी ५.३० पर्यंत. तर मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील. सोमवारी ता.१८ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम (ता.२१) जानेवारी गुरुवारपर्यंत आहे.
हेही वाचा - परभणी : कोव्हीड लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा सज्ज- जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
तहसील कार्यालयात बैठक
हिंगोली येथील तहसील कार्यालयात ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात बुधवारपासून सुरू होणाऱ्या नामनिर्देशन पत्राच्या माहितीसाठी तहसीलदार पांडुरंग माचेवाड, गटविकास अधिकारी मिलिंद पोहरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या वेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
संपादन ः राजन मंगरुळकर