महिला दिन विशेष - डॉ. वनमाला खरवडकर बीड जिल्ह्यातील पहिल्या एमबीबीएस डॉक्टर

दत्ता देशमुख
Sunday, 8 March 2020

बीड जिल्ह्यातील पहिल्या महिला डॉक्टर कोण, याची माहिती वैद्यकक्षेत्रातील मंडळींना व या क्षेत्रातील संबंधीतांपैकी मोजक्याच मंडळीला असू शकेल. डॉ. वनमाला खरवडकर या जिल्ह्यातील पहिल्या एम. बी. बी. एस. डॉक्टर होत्या.

बीड - आज जिल्ह्यात किमान एम. बी. बी. एस. डॉक्टरांची संख्या (शिकत असलेल्या आणि नोकरीत असलेल्या) दीड हजारांच्या मागे पुढे असून यात पाचशेच्या पुढे महिला-मुलींची संख्या आहे. परंतु, जिल्ह्यातील पहिल्या महिला डॉक्टर कोण, याची माहिती वैद्यकक्षेत्रातील मंडळींना व या क्षेत्रातील संबंधीतांपैकी मोजक्याच मंडळीला असू शकेल.

डॉ. वनमाला खरवडकर या जिल्ह्यातील पहिल्या एम. बी. बी. एस. डॉक्टर होत्या. विशेष म्हणजे आजपासून तब्बल ७० वर्षांपूर्वी त्यांनी ही पदवी मिळविली होती. 
विशेष म्हणजे पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी आणि पहिल्या स्त्रीरोग तज्ज्ञही (एम. डी. गायनॅकलॉजी) त्याच होत्या. त्या काळात मराठवाड्यात वैद्यकीय महाविद्यालयही नव्हते. राज्यात पुणे-मुंबईसारख्या मोजक्याच ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये असत आणि त्यातही मुलींची संख्या एखादी दुसरी. त्यावेळी डॉ. वनमाला खरवडकर यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून ही पदवी मिळविली.

हेही वाचा - प्रेरणादायक! अंगणवाडी सेविकेचा मुलगा झाला आयएफएस

विविध वैद्यकशास्त्रांमध्ये आजही ॲलोपॅथीचे महत्व वेगळे आहे. सर्वच पॅथींमधून वेगवेगळे उपचार होत असले तरी या पॅथीकडेच अधिक ओढा असतो. समाजात आजही एम. बी. बी. एस. ला (बॅचलर इन मेडिसीन, बॅचलर इन सर्जरी) प्रवेश मिळाला की नातेवाईक आणि विद्यार्थ्याला आकाश ठेंगणे पडते. अलीकडे मुलींचे प्रमाणही खूप वाढले आहे. परंतु, तब्बल ७० वर्षांपूर्वी जिल्ह्यात डॉ. वनमाला खरवडकर यांनी ही पदवी मिळविली होती. विशेष म्हणजे हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून एम. बी. बी. एस. चे शिक्षण पूर्ण केले. मुळ उस्मानाबाद येथील रहिवाशी असलेल्या डॉ. वनमाला खरवडकर या सोलापूरला शिकत होत्या. त्यांना त्यावेळी सोलापूर - उस्मानाबाद हा प्रवास देखील बैलगाडीतून करावा लागे.

हेही वाचा - जालना जिल्ह्यात मुली होणार संगणक साक्षर

१९५१ ला एम. बी. बी. एस. ला प्रवेश घेऊन १९५६ मध्ये त्यांनी हातात पदवी घेतली. यातूनच त्यांची हुशारी, शिकण्याची जिद्द सहज लक्षात येईल. त्यांची पहिली पोस्टींग जालन्याला झाली. त्यावेळी मुळचे खरवड (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथील पण बीडला स्थिरावलेले डॉ. प्रभाकरराव खरवडकर हे देखील त्यांच्याच वर्गात होते. दोघांनीही एकाच वेळी वैद्यकशास्त्रातील पदवी हातात घेतली आणि लग्न केले.

हेही वाचा - परीक्षा संपेपर्यंत तिला या दुःखाची कल्पनाच नव्हती...

दरम्यान, १९५९ मध्ये दोघेही बीडच्या जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. यानंतर १९६२ मध्ये डॉ. देवयानी खरवडकर यांची स्त्रीरोग तज्ज्ञ (एम. डी. गायनॅकलॉजी) या पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी मुंबईच्या सेंट जॉर्ज निवड झाली. तर, डॉ. प्रभाकर खरवडकर यांची भुलतज्ज्ञ (एम. डी. ॲनेस्थेटीक) या पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली. त्यानंतर मात्र मित्रांच्या सल्ल्याने दोघांनीही शासकीय नोकरी सोडून खासगी प्रॅक्टीस केली. पुढच्या पिढीत त्यांचे चिरंजीव डॉ. दिलीप खरवडकर व त्यांच्या पत्नी डॉ. देवयानी खरवडकर हे दोघेही वैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर पदवीधारक आहेत. 

प्रसुतीसाठी गेवराई, माजलगावला 
डॉ. वनमाला खरवडकर यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून पदवी मिळविली तेव्हा जिल्ह्यात महिलांतही असे एखाद दुसरेच कोणी असेल. त्या काळात त्यांना प्रसुतीसाठी माजलगाव, गेवराईला जावे लागे. प्रवासाची तुरळक यंत्रणा असतानाही सेवा म्हणून त्या काम करत.  

 हेही वाचा - कोरोनाचा डर - ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात मास्क घालूनच प्रवेश करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first MBBS doctor in Beed district