दुग्धव्यवसाय वाढीसाठी जालन्यात पहिला प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

नांदेड - दुग्ध व्यवसाय वाढीसाठी मराठवाड्यात पायलट प्रोजेक्‍ट राबविण्यात येणार असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे. जालन्यात पहिला प्रकल्प सुरू होणार असून नंतर तो टप्प्याटप्याने मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास राज्यमंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी (ता. 25) येथे पत्रकार परिषदेत दिली.

श्री. खोतकर म्हणाले की, दुग्ध व्यवसायात पश्‍चिम महाराष्ट्र कायम आघाडीवर तर मराठवाडा मागे आहे. मराठवाड्यात देशी गायींचे संगोपन, संवर्धनासह दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी, अशी अनेक दिवसांची मागणी आहे. त्यानुसार पायलट प्रोजेक्‍ट राबविण्याचा निर्णय झाला आहे. देशी गायींच्या दुधाला मागणी जास्त आहे. त्यामुळे देशी गायींचे महत्त्व वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर लुप्त होत चाललेल्या लाल कंधारी, गीर, गौर सहवाल गायी तसेच देशी म्हशींच्या उच्च प्रतिच्या जातींची पैदास वाढविण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. देशी गायी, म्हशी, वळूंचे संवर्धन, संगोपनावर भर देत दुग्ध व्यवसाय वाढविला जाईल.

Web Title: The first project for the growth of dairy in Jalna