सध्या तरी तिला पाहूनच समाधान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

औरंगाबाद - स्मार्ट सिटी होणार, शहरात स्मार्ट बस सुरू होणार असे म्हणत म्हणत चार वर्षे निघून गेली. सध्या महापालिकेकडे पहिली स्मार्ट बस दाखल झाली असल्याने तिला लोकांना पाहता यावे यासाठी पर्यटनस्थळांसह शहराच्या प्रमुख चौकांमध्ये बस उभी करण्यात येत आहे.

रविवार (ता.१६) सुटीचा दिवस असल्याने निराला बाजार भागातील तापडिया नाट्यमंदिर आणि जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ बीबी का मकबरा येथे पहिली स्मार्ट बस नागरिकांना पाहण्यासाठी उभी करण्यात आली होती. तिला पाहण्यासाठी उत्सुकांची दोन्ही ठिकाणी गर्दी झाली होती.

सात डिसेंबरला पहिली स्मार्ट बस महापालिकेच्या ताब्यात आल्यावर स्मार्ट सिटीचे मेन्टॉर सुनील पोरवाल यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. यानंतर स्मार्ट बसची लोकांना माहिती मिळावी यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी ही बस शहरातील पर्यटनस्थळांसह मुख्य चौकात उभी करण्याचे प्रशासनाला सूचित केले, त्यानुसार महापालिका प्रशासनाने शहराच्या वेगवेगळ्या भागात पहिल्या स्मार्ट बसचे प्रदर्शन सुरू केले आहे. 

रविवारी (ता. १६) बीबी का मकबरा परिसरात सकाळी १० वाजता स्मार्ट बस उभी करण्यात आली. बीबी का मकबरा पाहून आल्यानंतर पर्यटकांनी बसमध्ये बसण्याचा आनंद घेतला. काही जणांनी स्मार्ट बससोबत सेल्फीदेखील काढली. दुपारी २ वाजेपासून स्मार्ट बस तापडिया नाट्यमंदिरासमोर उभी करण्यात आली. बाजारपेठेत येणारे ग्राहक व नागरिक थांबून बस पाहत होते. 

दररोज असणार बसचे प्रदर्शन
महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पातून सिटीबस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १०० बस खरेदी करण्याचा टाटा कंपनीशी करार करण्यात आला. करारानुसार पहिल्या टप्प्यात ३०, तर दुसऱ्या टप्प्यात ६० बस उपलब्ध होणार आहेत. पहिल्याच दिवशी बस पाहण्यासाठी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दररोज ही बस वेगवेगळ्या पर्यटनस्थळासह शहराच्या मुख्य चौकात उभी केली जाणार आहे.

Web Title: first smart bus in aurangabad