शिवसेनेचा हिंगोलीत प्रथमच मोठ्या मताधिक्‍याने विजय 

मंगेश शेवाळकर
शुक्रवार, 24 मे 2019

हिंगोली : हिंगोली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी तब्बल दोन लाख ७७ हजार मतांनी विजय मिळविला असून या मतदारसंघामध्ये प्रथमच शिवसेनेला पावणेतीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्‍य मिळाले. 

हिंगोली : हिंगोली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी तब्बल दोन लाख ७७ हजार मतांनी विजय मिळविला असून या मतदारसंघामध्ये प्रथमच शिवसेनेला पावणेतीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्‍य मिळाले. 

हिंगोली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत पाटील, काँग्रेसचे सुभाष वानखेडे, वंचित बहूजन आघाडीचे मोहन राठोड यांच्यात तिरंगी लढतीचे चित्र होते. त्यामुळे तिरंगी लढतीमधे कोण विजय मिळविणार याबाबत तर्कवितर्क लावले जाऊ लागले होते. मतदानानंतर होणाऱ्या आकडेमोडीमधे शिवसेना किंवा काँग्रेसचा उमेदवार केवळ आठ ते दहा हजार मतांनी विजयी  होईल असा अंदाज बांधला जाऊ लागला होता. त्यामुळे जय पराजयावर पैजा लागू लागल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीमधे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी घेतलेली आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिली. रात्री उशीरा झालेल्या मतमोजणीमधे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांना पाच लाख ८६ हजार ३१२ मतदान मिळाले आहे. काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना तीन लाख आठ हजार ४५६ मतदान मिळाले वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांना एक लाख ७४ हजार ५१ मते मिळाली आहेत.

मतमोजणीमधे रात्री उशीरा लागलेल्या निकालामधे शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी दोन लाख ७७ हजार मतांनी दणदणीत विजय मिळविला आहे. श्री. पाटील यांना मिळालेली आघाडी मराठवाड्यातील विजयी उमेदवारांपेक्षा सर्वात जास्त आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेला मागील निवडणुकीत कमी झालेल्या मतदानाची कसर यावेळी भरून काढण्यात आल्याचे चित्र स्पष्ट आहे. मोदी लाटेमधे मागील वेळी शिवसेनेला पराभव स्विकारावा लागला होता. मात्र यावेळ मोदी लाटेतच या जागेवर शिवसेनेचे पुन्हा एकदा वर्चस्व सिध्द करून हिंगोली लोकसभा मतदारसंघात प्रथमच सर्वात जास्त मताधिक्य मिळविले आहे. विशेष म्‍हणजे यावेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला मोठे मताधिक्‍य मिळाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first time major margin in hingoliby Shivsena