esakal | लातुरात पुन्हा ‘रेमडेसिव्हिर’चा काळाबाजार, पाच जणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir

लातुरात पुन्हा ‘रेमडेसिव्हिर’चा काळाबाजार, पाच जणांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर: येथे गरजू रुग्णांचे नातेवाईक हेरून त्यांना २५ हजार रुपयाला प्रत्येकी एक रेमडेसिव्हिर इंजेक्शन विक्री करून काळाबाजार करू पाहणाऱ्या पाच संशयितांना अटक करण्यात आली. यातील तिघे हे लॅब टेक्निशियन आहेत. काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यातही संशयित फार्मसी व लॅब टेक्निशियन्सशीच संबंधी होते.

सध्या कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. मोठ्या प्रमाणात गंभीर रुग्ण येत आहेत. त्यांच्यावर डॉक्टर रेमडेसिव्हिर इंजेक्शन देऊन बरे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या इंजेक्शनची मागणी लक्षात घेऊन त्याचा काळाबाजारही केला जात आहे. पुरेसा पुरवठा होत नसल्याने रुग्णाचे नातेवाईक पंचवीस हजार, तीस हजार रुपये देऊन हे इंजेक्शन खरेदी करीत आहेत. असा काळाबाजार करणाऱ्यांवर सध्या पोलिसांची नजर आहे. येथील गिरवलकर मंगल कार्यालयाच्या परिसरात एक तरुण रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचा: 'हाताला काम नाहीतर सरसकट मदत तरी द्या'

त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे एक पथक तेथे गेले. त्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याची पोलिसांनी चौकशी केली असता यात एक चेनच असल्याचे समोर आले. पोलिसांनी अधिक तपास करून ऋषिकेश महादेव कसपटे (वय २२, रा. वाल्मीकीनगर), शरद नागनाथ डोंगरे (२७, रा. विकासनगर), ओम सुदर्शन पुरी (२४, रा. एकुरगा), ओमप्रसाद हनमंत जाधव (रा. हिप्पळगाव), किरण भरत मुधाळे (२०, रा. नंदीस्टॉप), सिद्धेश्वर राजेंद्र सुरवसे (२१ रा. नंदीस्टॉप) या सहा जणांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा: आईच्या मृत्यूनंतर तीन वेळेस गेला जीव द्यायला!

या सहापैकी जाधव सोडून इतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून दोन रेमडेसिव्हिर इंजेक्शन तसेच चार मोबाईल असा एकूण एक लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

loading image