औरंगाबाद : 'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

योगेश पायघन
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : महापालिकेत एमआयएम नगरसेकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक सय्यद मतीनने यांच्या जबाबावरून हा गुन्हा नोंद करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी सांगितले. 

याप्रकरणात भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे, उपमहापौर विजय औताडे यांच्यासह अन्य दोन नगरसेवकांविरोधात जमावाने मारहाण कलाम 323,506,143,147,149 प्रमाणे सिटीचौक पोलिसात गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला.

एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीनला अटक : गुन्हा दाखल
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मारहाण झाल्यानंतर मतीन यांना घाटीत दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला वार्ड 17 मध्ये उपचार घेत असलेल्या मतीन यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर कैदी वार्डात शिफ्ट करन्यात आले. घाटीतुन सुटी करून त्यांना थोड्याच वेळात सिटी चौक पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे. दरम्यान पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नगरसेवक सय्यद मतीनवर उपमहापौर विजय औताडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आल्याचे पीआय शिनगारे म्हणाले. 

स्कार्पिओच्या तोडफोड प्रकरणी तिघांची चौकशी असून
महापालिका परिसरात स्कार्पिओच्या तोडफोड प्रकरणी तिघांना चौकशीसाठी उचलण्यात आले आहे. या प्रकरणात नऊ जणांची ओळख पाठवण्याचे काम पोलीस करत आहेत.

Web Title: Five BJP corporators booked for beating AIMIM corporator in Aurangabad