Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंविरोधात दोन दिवसात 5 गुन्हे दाखल; पोलीस झाले कठोर, कारण काय?

Manoj Jarange patil : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहेत. जरांगे पाटील हे बीड दौऱ्यावर आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilesakal

बीड- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहेत. जरांगे पाटील हे बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी दोन दिवसांमध्ये त्यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Five cases filed against Manoj Jarange patil in two days beed why police became strict)

जरांगे पाटील यांच्याविरोधात याआधी चार गुन्हे दाखल झाले होते. आता दोन दिवसात आणखी पाच गुन्हे त्यांच्याविरोधात दाखल झाले आहेत. त्यामुळे मनोज जरांगेंविरोधात पोलीस कठोर भूमिका घेत असल्याचं दिसत आहे. ( Manoj Jarange Patil Rally In Beed)

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : मराठयांना ओबीसीमधून आरक्षणाशिवाय सरकारला सुट्टी नाही - मनोज जरांगे-पाटील

मनोज जरांगे पाटील यांच्या सभा, बैठका उशिरापर्यंत होत असतात. या सभांवर पोलीस करडी नजर ठेवून आहेत. जरांगे पाटील यांच्या सभा किंवा बैठका झाल्या त्याठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव, अंबाजोगाई अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले केले होते. महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केले होते. ठिकठिकाणी सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्यांच्या आंदोलनाला यश देखील आलं. कुणबी नोंदी असलेल्या लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळू लागलं. तसेच मराठ्यांच्या वेगळं आरक्षण देणारा कायदा देखील सरकारने आणला आहे.

Manoj Jarange Patil
Bhaiyyaji Movie : मनोज वाजपेयीच्या '१००' व्या चित्रपटाची घोषणा, 'जोराम' नंतर करणार मोठा धमाका!

मनोज जरांगे पाटील यांना सरकारच्या कायद्यापेक्षा सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी लावून धरली आहे. यासाठी त्यांनी पुन्हा उपोषण सुरु केले होते. पण, यावेळी सरकारकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद कमी झाला होता. माध्यमांसमोर बोलताना जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून त्यांच्या आंदोलनाची धार कमी झाली आहे. पोलिसही त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेताना दिसत आहेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com