Food Poisoning Marathwada: परभणी जिल्ह्यातील सोना गावात पाचशे जणांना भगरीतून विषबाधा

सोना (ता. परभणी) या गावात भगरीतून 500 जणांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री एकच्या सुमारास घडली.
five hundred people were food poisoned parbhani health hospital doctor
five hundred people were food poisoned parbhani health hospital doctorSakal

परभणी : सोना (ता. परभणी) या गावात भगरीतून 500 जणांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री एकच्या सुमारास घडली. यापैकी अडीचशे गावकऱ्यांवर गावातील एका मंदिरात तर उर्वरित अडीचशे जणांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

परभणी तालुक्यातील सोन्ना या गावात ही घटना घडली. मंगळवारी एकादशी असल्याने गावातील एका दुकानातून ग्रामस्थांनी भगर विकत घेतली होती. या भगरीतून गावकऱ्यांना विषबाधा झाली. रात्री बारानंतर गावातील लोकांना अचानक उलट्या होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे काही जणांनी गावातील डॉक्टरांकडे दाखवले. परंतु उलट्या होण्याचे प्रमाण वाढल्याने व गावकऱ्यांची संख्या देखील झपाट्याने वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले.

याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला घटनेची कल्पना देत तातडीने आरोग्य पथक सोना गावात पाठविण्याचे आदेश दिले. स्वतः जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गीते ,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी सोना गावास भेट दिली. ज्या गावकऱ्यांना जास्त प्रमाणात उलट्या होत्या.

त्या सर्व ग्रामस्थांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित ग्रामस्थांना गावातील मंदिर सभागृहात उपचार सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी यांच्या सर्व वरिष्ठ अधिकारी व आरोग्य विभागाचे पथक सोना गावात ठाण मांडून होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com