esakal | जालन्यात भीषण स्‍फोट, उकळत्या लोखंडाचे द्रव अंगावर पडल्याने पाच ठार, सहा जखमी

बोलून बातमी शोधा

जालना : औद्योगिक वसाहतीतील ओम साई राम कारखाना. 

औद्योगिक वसाहतीतील ओम साई राम स्‍टील कारखान्यात गुरुवारी लोखंड वितळणाऱ्या बॉयलरचा अचानक स्फोट झाला. या स्‍फोटात तेथे काम करणाऱ्या पाच कामगारांचा भाजून मृत्यू झाला, तर इतर सहा कामगारांच्या अंगावर उकळलेल्या लोखंडाचे द्रव पडल्याने ते गंभीर भाजले.

जालन्यात भीषण स्‍फोट, उकळत्या लोखंडाचे द्रव अंगावर पडल्याने पाच ठार, सहा जखमी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना -  शहरातील औद्योगिक वसाहतीतील एका स्‍टील उत्पादक कंपनीत गुरुवारी (ता. पाच) दुपारी चार वाजेच्या सुमारास बॉयलरचा स्फोट होऊन पाच कामगार ठार झाले, तर सहा कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहतीतील ओम साई राम स्‍टील कारखान्यात गुरुवारी लोखंड वितळणाऱ्या बॉयलरचा अचानक स्फोट झाला. या स्‍फोटात तेथे काम करणाऱ्या पाच कामगारांचा भाजून मृत्यू झाला, तर इतर सहा कामगारांच्या अंगावर उकळलेल्या लोखंडाचे द्रव पडल्याने ते गंभीर भाजले. त्यांना तातडीने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

कुठं सापडलं जळालेल्या अवस्थेतलं प्रेत...

रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नाही 

स्‍टील कारखान्यात झालेल्या स्फोटप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक श्‍यामसुंदर कौठाळे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

शुक्रवारी होणार शवविच्छेदन 

स्फोटात मृत पावलेल्या तीन कामगारांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्‍छेदनगृहात ठेवण्यात आले आहेत.  दरम्यान, या तीनही मृतदेहांची उत्तरीय तपासणी शुक्रवारी (ता. सहा) करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

पुन्हा एका बालिकेवर अत्याचार.. वाचा कुठे