गाडीची काच फोडून पाच लाख रुपये लंपास

प्रशांत बर्दापूरकर
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

अंबाजोगाई : शहरातील प्रशांतनगर भागात मंगळवारी (ता.४) सकाळी अकराच्या सुमारास व्यापाऱ्याच्या गाडीची काच फोडून अज्ञातांनी पाच लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली. या घटनेचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्यात अज्ञातांचे चेहरेही आले आहेत.

प्रशांतनगर भागात ईश्वर लोहियांचे पान मटेरियलचे दुकान आहे. मंगळवारी सकाळी त्यांनी दुकान उघडून बँकेत जाण्यासाठी आपल्या गाडीत पैशाची पिशवी ठेवली. काही तरी राहिले म्हणून ते परत दुकानात आले. तोपर्यंत चोरट्यांनी संधी साधत गाडीची काच फोडून आतील पाच लाख रुपये ठेवलेली पिशवी लंपास केली. काचेचा आवाज येऊ नये म्हणून शक्कल लढवत दुचाकी रेस करून त्याच्या आवाजातच क्षणात ही चोरी केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला होता.

Web Title: Five Lakhs Rupees Stolen From car in Beeds Amajogai

टॅग्स