परळीहून गंगाखेडला आलेले पाच लाख पकडले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

गंगाखेड - चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा असलेली पाच लाख रुपयांची रोकड गंगाखेड पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जप्त केली.

गंगाखेड - चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा असलेली पाच लाख रुपयांची रोकड गंगाखेड पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जप्त केली.

परळीकडून गंगाखेड शहरात पाच लाख रुपयांची रोकड येत असल्याची माहिती गंगाखेड पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून परळी नाका येथे पोलिसांनी सापळा लावला होता. रात्री साडेनऊला एक चारचाकी वाहन पोलिसांनी अडवून झडती घेतली असता गाडीत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले. पोलिसांनी ही गाडी व चालकाला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या गाडी चालकाची उपविभागीय पोलिस अधिकारी चौकशी करत होते. ही रोकड कोणाची आहे? कोठे जात होती, याची माहिती मिळाली नाही. सध्या गंगाखेड नगर पालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. यासाठी हा पैसा आणला गेला असावा का? याची माहिती घेत आहोत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Web Title: five million caught Gangakhed

टॅग्स