ग्रामसेवक हरवला, चावडीवर फलकच लावला

भोगगाव (ता. घनसावंगी) : गावात लावण्यात आलेला ग्रामसेवक हरवल्याचा फलक. 
भोगगाव (ता. घनसावंगी) : गावात लावण्यात आलेला ग्रामसेवक हरवल्याचा फलक. 

तीर्थपुरी (जि.जालना) -  घनसावंगी तालुक्‍यातील भोगगाव येथे ग्रामस्थांनी चक्‍क ग्रामसेवक हरवल्याचा फलकच चावडीवर लावला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपासून ही स्थिती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, दुसरीकडे बदनामी करण्यासाठी उगाच कोणीतरी हा प्रकार केल्याचा ग्रामसेवकाने दावा केला आहे. 

भोगगाव येथील ग्रामसेवक लक्ष्मण भोजने हे गेल्या दोन वर्षांपासून गावात येत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही ग्रामस्थांनी गावात चावडीवर ग्रामसेवक हरवले असल्याचा फलकच झळकविला आहे.

संबंधितांनी ग्रामसेवकाला गावात जाऊन ग्रामसभा घेऊन हजर राहण्याच्या सूचना द्याव्यात नसता ता. 22 फेब्रुवारीला ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

गावात गेल्या दोन वर्षांपासून ग्रामसभा घेण्यात येत नाही. ग्रामसेवक संगनमताने या ठिकाणची कामे चालवितात. त्यामुळे ग्रामसेवकास ग्रामसभा घेऊन माहितीच्या अधिकाराखाली मागविलेली माहिती देऊन गावात हजर राहण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या निवेदनावर गणेश मुळे, लक्ष्मण मुळे, राधेश्‍याम मुळे, शरद मुळे, उद्धव मुळे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत. विशेष म्हणजे गावात काही ग्रामस्थांनी ग्रामसेवक हरवल्याचा फलकही लावला आहे. त्यामुळे गावात याबाबत चांगलीच चर्चा जोर धरत आहे. 

मी नियमित गावात जात असून दर महिन्याला मासिक मीटिंग घेत आहे. या गावात मी 13 महिन्यांपासून कार्यरत असल्याने दोन वर्षांपासून येत नसल्याचा आरोप चुकीचा आहे. माझी बदनामी करण्याच्या हेतूने गावात मी हरवल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. 
लक्ष्मण भोजने, ग्रामसेवक 

भोगगाव येथील ग्रामसेवक गावात येत नसल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. गावात मासिक मीटिंग घेण्यात येते; मात्र ग्रामसभा होत नसल्याची तक्रार करण्यात आली असून, याची चौकशी करण्यात येईल. 
अशोक गुंजकर, गटविकास अधिकारी, घनसावंगी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com