महापुराचा बोकड विक्रीवर 40 टक्‍के परिणाम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या बकरी ईद सणावर गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाचे सावट होते. यंदाही मराठवाड्यातील दुष्काळासह कोल्हापूर, सांगलीसह इतर जिल्ह्यांत आलेल्या महापुराचा परिणाम झाला आहे. यामुळे व्यवसायात 40 टक्‍के घट झाली असून, बोकड विक्रीही मंदावली असल्याचे होलसेल विक्रेते जुनेद खानी यांनी सांगितले.

औरंगाबाद - अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या बकरी ईद सणावर गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाचे सावट होते. यंदाही मराठवाड्यातील दुष्काळासह कोल्हापूर, सांगलीसह इतर जिल्ह्यांत आलेल्या महापुराचा परिणाम झाला आहे. यामुळे व्यवसायात 40 टक्‍के घट झाली असून, बोकड विक्रीही मंदावली असल्याचे होलसेल विक्रेते जुनेद खानी यांनी सांगितले.

बकरी ईदला मराठवाड्यात लाखो बोकडांची विक्री होते. एकट्या औरंगाबाद शहरात ईदसाठी त्याच आठवड्यात एक लाख बकरे विक्री होतात. ईदसाठी खास राजस्थानातून बोकड मुंबईसह राज्यातील इतर भागांत विक्रीसाठी आणण्यात येत आहे. बकरी ईदसाठी बाजारात विक्रीसाठी आलेले बकरे सात हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत मिळत आहेत. हे राजस्थानातील बकरे मुंबईतील पावसामुळे आता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत विक्री करीत आहेत. दुष्काळामुळे या भागात खरेदीसाठी मात्र अल्प प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात बोकडांना आजारपण जास्त येत असल्यामुळे बकरी ईदसाठी लागणाऱ्या बोकडांची आरोग्य तपासणी करूनच खरेदी केली जात आहेत. यामुळे विक्रीवर मोठा परिणाम दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood 40 Percentage Effect on Goat Buck Sailing