शेतकऱ्याने फिरविला फुलशेतीवर नांगर 

विशाल अस्वार
मंगळवार, 7 एप्रिल 2020

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील फुलांची विक्री बुलडाणा, जळगाव, भुसावळ, पुणे आदी ठिकाणी विक्री होते. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्‍पन्नही मिळत होते; मात्र कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर संचारबंदीची अंमलबजावणी सुरू असल्‍याने फुलांची विक्री थांबली आहे. यामुळे अनेक शेतात फुले तोडणीअभावी शेत रंगीबेरंगी झाले आहे.

वालसावंगी (जि.जालना) - परिसरात अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने झेंडू, गुलाब, शेवंती आदींची फुलशेती केली होती. मात्र कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर मागील वीस दिवसांपासून फुलांची विक्री बंद आहे. त्यामुळे फुलशेतीवर नांगर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील शेतकऱ्यांनी सण-उत्सव, लग्नसराईमळे फुलशेतीला प्राधान्य दिले. परिसरातील फुलांची विक्री बुलडाणा, जळगाव, भुसावळ, पुणे आदी ठिकाणी विक्री होते. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्‍पन्नही मिळत होते,

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

 कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर संचारबंदीची अंमलबजावणी सुरू असल्‍याने फुलांची विक्री थांबली आहे. यामुळे अनेक शेतात फुले तोडणीअभावी शेत रंगीबेरंगी झाले आहे.

हेही वाचा : जालन्यात आता गल्लोगल्ली लॉकडाऊन 

विक्रीच होत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, लावलेला खर्चदेखील वसूल होईनासा झाला आहे. पुढील काही दिवस हीच परिस्थिती असल्याने नाइलाजाने शेतकऱ्यांना बहरलेल्या फुलशेतीवर जड मनाने नांगर फिरवावा लागत आहे. 

मी दोन एकर क्षेत्रात झेंडू आणि शेवंती फुलांची लागवड केली होती. शेतीदेखील चांगली बहरली होती. मात्र कोरोनामुळे होत्‍याचे नव्‍हते झाले आहे. संचारबंदी सुरू असल्याने फुलांची विक्री होऊ शकत नाही. त्यामुळे फुलशेतीवर नांगर फिरविला आहे. 
-शरद कोथलकर, 
फुलउत्पादक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flower farming in trouble