esakal | नांदेड जिल्ह्यात केवळ ४४७ जणांची कोरोना चाचणी, पाच पाॅझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना चाचणी

नांदेड जिल्ह्यात केवळ ४४७ जणांची कोरोना चाचणी, पाच पाॅझिटिव्ह

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - सध्या सण-उत्सवाचे वातावरण असल्याने बाजारपेठेत प्रचंड गर्दी होत आहे. असे असले तरी, मागील दाही दिवसापासून चाचणीचा वेग मंदावला आहे. महापालिकेअंतर्गत (Nanded Municipal Corporation) व तालुका व गावपातळीवर बोटावर मोजण्या इतक्यात कोरोना संशयित व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. शनिवारी (ता.११) जिल्हाभरातील ४४७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी केवळ पाच जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मंदावलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.जिल्ह्यातील (Nanded) कोरोना उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे काही प्रमाणात का होईन वाढले होते. मात्र चाचण्या कमी झाल्याने हे प्रमाणत किंचित खाली आले असून सध्या बरे होण्याचे प्रमाण ९७ .२ टक्क्यांवर आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ९० हजार २८१ एवढी झाली असून यातील ८७ हजार ५९५ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजघडीला जिल्हाभरात ३६ शनिवारी जिल्हाभरात केवळ ४४७ जणांची चाचणी कोरोनाबाधित (Corona) रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी सहा बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

हेही वाचा: हे तू काळी आहे, असे हिणवत असल्याने विवाहितेने घेतला गळफास

शनिवारी दिवसभरात एकाही गंभीर रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात एकूण बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५१ एवढी स्थिर आहे. शनिवारी नांदेड वाघाळा महापालिकेंतर्गत - दोन, कंधार- एक, हिंगोली- एक व उमरखेड - एक असे एकुण पाच बाधित आढळले. शनिवारी दिवसभरात महापालिकेअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण कक्षातील दोन बाधितांना रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

नांदेड कोरोना मीटर

एकूण बाधित - ९० हजार २८१

एकूण बरे - ८७ हजार ५९५

एकूण मृत्यू - दोन हजार ६५१

शनिवारी बाधित - पाच

शनिवारी बरे - दोन

शनिवारी मृत्यू - शुन्य

उपचार सुरु - ३६

अतिगंभीर प्रकृती - सहा

loading image
go to top