केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करावे : आमदार राहुल पाटील

file photo
file photo

परभणी : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार ज्या उपाययोजना सांगत आहेत. त्याची आपण सर्वांनी कडक अंमलबजावणी केली पाहिजे. मी ही सध्या माझ्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. एैतिहासिक पुस्तके वाचन सुरू आहे. मतदारसंघातील कामेदेखील फोनवरूनच करत आहे, असे परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा व पहा - Video : परभणी महापालिकेतर्फे शहर निर्जंतूकीकरणाचे काम सुरु
‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. यात राजकीय पुढारीदेखील मागे नाहीत. परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील या दरबार २४ तास गजबजलेला असतो. परंतु, या दिवसांत तो पूर्णत: निर्मनुष्य राहील याची काळजी स्वतः आमदार डॉ. पाटील यांनीच घेतली आहे. तशा सूचनाच त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 

कामेदेखील फोनवरूनच सोडविण्याचा प्रयत्न
काय कामे असतील ती फोनवरच करावीत, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. असे असताना लोकांशी सतत संपर्कात राहून आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सध्या घरात राहूनच मतदारसंघातील कारभार पाहणे पसंत केले आहे. मतदारसंघातील महत्त्वाची कामेदेखील ते फोनद्वारेच पूर्ण करीत आहेत. एरवी माणसाच्या गरड्यात राहणारा नेत्या घरी बसून काय करतो, असे विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, मी सध्या माझी पत्नी डॉ. संप्रिया व दोन मुली यांच्या सहवासात दिवस घालवित आहे. त्यांनाही मी जास्त वेळ सोबत राहात असल्याने आनंद होत आहे. परंतु, या परिस्थितीत मतदारसंघातील लोकांना कसे सोडणार म्हणून त्यांची कामेदेखील मी फोनवरूनच सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे.



 सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे
आपण काही दिवस घरात बसून राहिलो तर नक्कीच आपण हा लढा जिंकू, असा विश्वास व्यक्त करून लोकांनीदेखील विनाकारण घराबाहेर फिरणे टाळावे, कुणाशी संभाषण करण्याची वेळच आली तर एक मीटर दुरूनच बोलावे. शासन व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
- डॉ. राहुल पाटील, आमदार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com