रेल्वेकडून गरजूना अन्नधान्याची मदत

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 20 एप्रिल 2020

नांदेड विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी जमवलेल्या निधीतून ५० गरजूंना नांदेड रेल्वे स्थानकावर अन्नधान्याचे कीट्स वाटप.

नांदेड : सर्व देशावर कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संकट ओढवले आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या कुटुंबाना नांदेड रेल्वे विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी जमवलेल्या निधीतून गरजुना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती. 
सर्व प्रवासी रेल्वे सेवा ता. तीन मेपर्यंत देशभर बंद आहेत.
 
परंतु त्याच वेळेस अत्यावश्यक वस्तू, अन्नधान्य, खते- बियाणे, कोळसा, भाजीपाला, दूध इत्यादी जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तू घेऊन भारतीय रेल्वेमध्ये माल वाहतूक सेवा सुरु आहे. याकरीता  सर्व रेल्वे स्थानकावरील आणि नियंत्रण कार्यालयातील कामकाज सुरळीतपणे सुरु ठेवण्याकरिता रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. 

हेही वाचा -  सोमवारी ४६ संशयितांचे स्वॅब अहवाल येणार 

रेल्वेच्या कंत्राटी कर्मचऱ्यांना मदत

प्रवासी रेल्वे सेवा बंद असल्यामुळे विविध रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काही अंशी आर्थिक अडचण येत आहे. या भावनेतून विविध रेल्वे स्थानकावर काम करून पोट भरणाऱ्या लोकांची अडचण लक्षात घेऊन नांदेड रेल्वे विभागात अशा लोकांची अन्नधान्यांची सोय करण्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी ठरवले आहे. यामुळेच गेल्या दोन आठवड्यात नांदेड रेल्वे विभागातील विविध रेल्वे स्थानकावर अशा गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले होते.

५० गरजूंना अन्नधान्य पाकिटांचे वाटप 
 
ता. १८ एप्रिल रोजी सकाळी पुन्हा हुजुर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर उपिंदर  सिंग यांनी सफाई कर्मचारी, रेल्वे हमाल यांना अन्नधान्याच्या पाकीटांचे वाटप केले. या प्रसंगी जे. एस. चौहाण, डीव्हिजनल पर्सनल ओफीसर (समन्वय) आणि विश्वनाथ फड, सहायक पर्सनल आॅफीसर इतर अधीकारी आणि कर्मचारी हे उपस्थित होते. नांदेड रेल्वेस्थानकावर अशा ५० गरजूंना अन्नधान्य पाकिटांचे वाटप करण्यात आले. या पाकीटात गहू पीठ, तांदूळ, डाळ, तेल, साखर इत्यादी वस्तू होत्या. विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी जमवलेल्या निधीतून हे अन्नधान्य वाटप करण्यात आले.
अशा प्रकारचे कार्य नांदेड रेल्वे विभागातील इतर रेल्वे स्थानकावर ही केले जात आहे. गरज पडल्यास रेल्वे प्रशासन अशा प्रकारचे कार्य पुन्हा करेल असे उपींदर सिंघ यांनी सांगीतले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Food aid to the needy by rail nanded news