खाद्यतेल महागल्याने बजेट कोलमडणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

औरंगाबाद - गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यापाठोपाठ आता मागील आठवड्यात खाद्यतेलाचे आयात शुल्क वाढल्याने तेलाच्या किमतीत तीन ते चार रुपयांची वाढ झाली. या दरवाढीमुळे पुन्हा सर्वसामन्यांचे आर्थिक गणित बिघडणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

केंद्र सरकारने चालू आठवड्यात आयात शुल्कात वाढ केल्याने स्थानिक बाजारातील खाद्यतेलावर याचा परिणाम झाला आहे. 20 ते 25 टक्‍क्‍यांवर असलेले आयात शुल्क 45 टक्‍क्‍यांवर आल्याने ही दरवाढ झाली आहे. यामुळे तेलाच्या किमतीत लिटरमागे तीन ते चार रुपये वाढ झाली आहे. ही दरवाढ झाली असली, तरी घाण्याच्या तेलाने सर्वसामन्यांना तारले आहे.

Web Title: food oil rate increase budget colapse

टॅग्स