Food Poisoning : सोन्ना गावापाठोपाठ पालम तालुक्यात भगर खाल्याने विषबाधा, सात रूग्णांवर उपचार

उपवासासाठी फराळ म्हणून भगर खालेल्या सात जणांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर पालम शहरातील प्रयाग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सदर घटना मंगळवारी (ता.6) दुपारनंतर घडली असून हे रूग्ण वेगवेगळ्या तीन गावचे रहिवासी आहेत.
food poisoning in palam 7 person hospitalized fasting food bhagar parbhani
food poisoning in palam 7 person hospitalized fasting food bhagar parbhaniSakal

परभणी : उपवासासाठी फराळ म्हणून भगर खालेल्या सात जणांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर पालम शहरातील प्रयाग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सदर घटना मंगळवारी (ता.6) दुपारनंतर घडली असून हे रूग्ण वेगवेगळ्या तीन गावचे रहिवासी आहेत.

खोरस येथील शिवाजी साहेबराव मानगीर यांनी उपवासासाठी एका दुकानातून भगर विकत आणले होेते. त्याची भाकर करून शिवाजी मानगीर यांच्यासह पत्नी आशाताई मानगीर (वय 46) आणि इंद्रजित गोविंदराव खंडागळे (वय 50) यांनी खाल्ली.

तदनंतर दिड तासांनी इंद्रजित खंडागळे आणि शिवाजी मानगीर गावापासून 10 किलो मीटर अंतरावर एका गावात गेल्यानंतर उलटी, मळमळ, चक्कर येणे आदी त्रास सुरू झाला. म्हणून त्यांनी पालम येथील प्रयाग हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी धाव घेतली. येथे प्रथमोपचार करून शिवाजी मानगीर यांनी लोहा (जि.नांदेड) येथील एका खासगी रूग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, शिवाजी मानगीर यांच्या पत्नीला देखील त्रास सुरू झाला.

म्हणून त्यांनी देखील पालम येथे आणण्यात आले. तिथे अशाच प्रकारचे चार रूग्ण पालम आणि गुळखुंड येथील आहेत. त्यात सुभाष लक्ष्मणराव क्षीरसागर (वय 58) आणि त्यांच्या पत्नी सुनिता सुभाष क्षीरसगार (वय 52 दोघे रा.पालम) यांचा समावेश आहे. त्यांनी देखील भगर खाल्याचे सांगितले. शिवाय, गुळखंड येथील सुमनबाई भगवानराव बगाडे आणि सारिका जगन्नाथ बगाडे यांनी देखील भगर खाल्ले होते. त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com