दोन अव्वल कारकून आणि गोदामपाल ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जून 2019

या विभागाने तब्बल नऊ महिन्यांनी कंपनीचे मालक अजय बाहेती व्यवस्थापक तापडिया, वाहतूक पुरवठादार राजू पारसेवार आणि खुराणा या चार जणांना 1 महिन्यापूर्वी अटक केली.

नांदेड : कृसणुर तालुका नायगाव येथील मेघा धान्य घोटाळ्यात अडकलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या दोन अव्वल कारकून मुक्रमाबाद आणि हदगाव येथील गोदामपालाना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री ताब्यात घेतले आहे. त्यांना रविवारी नायगाव न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

येथील मेघा कंपनीमध्ये ते शासकीय वितरणाचा गहू व तांदूळ तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी रेकी करून पकडला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलिसांनी करून न्यायालयात संबंधित मालक व पुरवठादार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची परवानगी मागितली होती. परंतु या प्रकरणाचा तपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला होता.

या विभागाने तब्बल नऊ महिन्यांनी कंपनीचे मालक अजय बाहेती व्यवस्थापक तापडिया, वाहतूक पुरवठादार राजू पारसेवार आणि खुराणा या चार जणांना 1 महिन्यापूर्वी अटक केली. सध्या हर्सूल कारागृहात स्थानबद्ध आहेत. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक लता फड, उपाधीक्षक पठाण आणि नांदेड सीआयडीचे श्री स्वामी यांनी आज पुन्हा या प्रकरणात सामील असलेले नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून ( पुरवठा) रमेश रामचंद्र भोसले आणि रत्नाकर नारायण ठाकूर तसेच मुक्रमाबाद गोदामपाल इस्माईलजी नागोराव विपटल व विजय मारोतराव शिंदे या चार जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अजून काही मोठे अधिकारी गळाला लागणार असल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: foodgrain scam in Nanded