सांगा... फुटपाथ कोणासाठी?

लातूर - शहराचा मध्यवर्ती भाग समजल्या जाणाऱ्या गांधी चौक ते गंजगोलाई परिसरातील पदपथांवर (फुटपाथ) विक्रेत्यांकडून अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे या भागात सतत वाहतूक कोंडी होते.
लातूर - शहराचा मध्यवर्ती भाग समजल्या जाणाऱ्या गांधी चौक ते गंजगोलाई परिसरातील पदपथांवर (फुटपाथ) विक्रेत्यांकडून अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे या भागात सतत वाहतूक कोंडी होते.

लातूर - भजे तळण्यापासून फळे विकण्यापर्यंत, कपड्यांपासून कापडी बॅगांपर्यंत, मोबाईलपासून किराणा मालापर्यंतची विक्री शहरातील पदपथांवर (फुटपाथ) बेकायदेशीरपणे सर्रास सुरू आहे. पण त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने पदपथांवरील विक्रेत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथांऐवजी चक्क रस्त्यांवरून चालावे लागत आहे. परिणामी, शहरातील वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. तरीही प्रशासन बघ्याच्या भूमिकेत आहे. 

शहरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. लहान- लहान चौकातील वाहतूकसुद्धा रेंगाळू लागली आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच पदपथांवरील अतिक्रमणांची भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांना पदपथ असूनसुद्धा रस्त्यांवरून चालावे लागत आहे. अशा स्थितीत रस्त्यावर चालताना एखाद्या पादचाऱ्याला अपघातात जीव गमवावा लागला तर याला जबाबदार कोण, असा सवालही यानिमित्ताने सुजाण लातूरकर उपस्थित करीत आहेत. शहरातील पदपथांची सकाळने पाहणी केली. त्यावेळी पदपथांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीत भर पडत असल्याचे समोर आले आहे. शहराचा मध्यवर्ती भाग समजल्या जाणाऱ्या महात्मा गांधी चौकापासून गंजगोलाईपर्यंत पदपथ आहे. पण दोन्ही बाजूकडील पदपथांवर शेवटपर्यंत अतिक्रमण झालेले पहायला मिळत आहे. तेथे कपड्यांपासून खाद्यपदार्थांपर्यंतची दुकाने थाटण्यात आली आहेत.

काही दुकानदारांनी बेकायदेशीर बॅनर उभे केले आहेत, तर काहींनी चक्क पदपथावर कमानी उभारल्या आहेत. काहींनी आपली वाहनेच पदपथांवर उभी केली आहेत, तर काहींनी दुकानाच्या पायऱ्या पदपथावर बांधल्या आहेत.

त्यामुळे पदपथ असतानाही त्याचा वापर पादचाऱ्यांसाठी होताना दिसत नाही. बार्शी रस्ता आणि अंबाजोगाई रस्त्यावरही अशीच स्थिती आहे. वाहनांचे पंक्‍चर काढण्यापासून वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करण्यापर्यंतचे अनेक बेकायदेशीर उद्योग पदपथांवर सर्रास सुरू आहेत.

शहरातील सगळीकडचे पदपथ विक्रेत्यांनी खाऊन टाकले आहेत. त्यामुळे लातुरात पदपथ आहेत की नाहीत, अशी सध्याची स्थिती आहे. या अतिक्रमणामुळे तर ज्येष्ठांची सर्वांत जास्त हेळसांड होत आहे. ही बाब प्रशासनाच्या सातत्याने निदर्शनास आणून देऊनही ते कुठलीही पावले टाकत नाहीत, हे आपले दुर्दैव आहे.
- बी. आर. पाटील, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ

नागरिकांचे लक्ष
दुकानांसमोरील पदपथावर (फुटपाथ) स्टॉल लावायचा असेल किंवा हातगाडी उभी करून व्यवसाय करायचा असेल तर महिन्याला भाडे द्यावे लागेल, असे दुकानदार विक्रेत्यांना सांगतात. त्यांच्याकडून भाडे उकळतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे शहराच्या मध्यभागातील दुकानांसमोर असे अतिक्रमण वाढले आहे. पण प्रशासनाकडून या प्रकाराकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या कारवाईकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com