esakal | फेसबूकवरून मांडूळाची तस्करी करणारे वनविभागाच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Eryx johnii

फेसबूकवरून मांडूळाची तस्करी करणारे वनविभागाच्या जाळ्यात

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: मांडूळाची तस्करी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला व त्याच्या साथीदारांना जालना वनसंरक्षक वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या सहकार्याने स्ट्राइक फोर्सने सोमवारी(ता.२०) सापळा रचत जालना व चिखली येथून पकडले. त्याच्या ताब्यातून दोन किलो ७०० ग्रॅम वजनाचे एक मांडूळ जप्त करण्यात आले.

मांडूळाची तस्करी करणाऱ्यांनी जालना येथे फेसबुक लाईव्ह केले. याची माहिती वन विभागाच्या स्ट्राइक फोर्सला मिळाली. स्ट्राइक फोर्स जालना येथे सापळा लावून एकास ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली असता त्याने मांडूळ घेऊन चिखली येथे मेहकर फाटा जवळ येणार असल्याचे सांगितले. यानंतर स्ट्राइक फोर्सतर्फे मेहकर फाट्याजवळ रात्री उशिरा सापळा लावून दुसऱ्या आरोपीस मांडूळसह ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा: आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार

दोन्ही आरोपींना मंगळवारी (ता.२०) जालना येथील सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना २२ जुलैपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई जालना उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत इटलोड, दक्षिणचे वनपरिक्षेत्राधिकारी अभय अटकळ, स्ट्राइक फोर्सचे प्रमुख आनंद गायके यांनी केली.

loading image