esakal | बिबट्याच्या मागावर दोन पथके, जामखेड परिसरात अजूनही दहशत
sakal

बोलून बातमी शोधा

4Bibtya_0_0

काही दिवसांपूर्वी जामखेड भागात हिंस्रप्राण्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता. हा हल्ला बिबट्याने केल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

बिबट्याच्या मागावर दोन पथके, जामखेड परिसरात अजूनही दहशत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना : काही दिवसांपूर्वी जामखेड भागात हिंस्रप्राण्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता. हा हल्ला बिबट्याने केल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. तसेच या बिबट्याच्या शोधाकामी जालना-औरंगाबाद वनविभागाचे पथक शोधकार्य करत आहे. मागील काही दिवसांपासून अंबड व बदनापूर तालुक्यातील वन्यप्राण्यांकडून हल्ले झाल्याच्या घटनासमोर आल्या आहेत. मात्र, वनविभागाकडून या हल्ल्यामागे कोणता हिंस्रप्राणी आहे, हे स्पष्ट केलेले नाही.

भाजपच्या भूलथापा आणि आश्‍वासनांना कंटाळून खडसे राष्ट्रवादीत आले, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

दरम्यान अंबड तालुक्यातील जामखेड येथे तर हिंस्रप्राण्याच्या हल्ल्यात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. महिलेवरील हा हल्ला बिबट्याने केला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. या बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाने दोन पथके स्थापन केले असून, एक पथक दिवसा, तर एक पथक रात्री शोधकार्य करीत आहे. दरम्यान, या बिबट्याच्या शोधासाठी जालना व औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्यांतील वनविभागाचे पथक दोनही जिल्ह्यांत शोधकार्य करीत आहेत, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

शोधानंतर लावणार पिंजरे
सध्या वनविभागाकडून बिबट्याचा मार्ग शोधण्याचे काम सुरू आहे. बिबट्याचा मार्गाचा सुगावा लागल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले जाणार आहेत, असेही वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

बोराळकर हे विजयी व्हावेत हे गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न आणि ते पूर्ण करू, पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्‍वास


अंबड तालुक्यातील बोरगाव येथील हरणावरील हल्ला हा कुत्र्यांनी केल्याचा संशय आहे. जामखेड येथील महिलेवर झालेला हल्ला हा बिबट्याने केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या बिबट्याच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आले असून जालना व औरंगाबाद या दोन ही जिल्ह्याचे पथक शोधकार्य करीत आहेत.
- अभय अटकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, जालना.
 

संपादन - गणेश पिटेकर 

loading image