

Forest Officer Umesh Gaikwad Urges Farmers to Remain Vigilant During Harvest
Sakal
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी-पिंपरखेड मार्गावरील जंगल परिसरात अस्वल दिसल्याने शेतकरी व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.तालुक्यातील सोनोशी येथील शेतकरी परमेश्वर मुंढे हे शेतीच्या कामानिमित्त शेतामध्ये गेले असताना त्यांना ता.२६ एप्रिल रोजी त्यांच्या शेतात लगत अस्वल दिसला परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या सुरक्षेतेसाठी तात्काळ अस्वलाची माहिती शेतकऱ्यांना दिली तसेच सदर शेतकऱ्याने स्वतःच्या मोबाईल मध्ये अस्वलाचे चित्रीकरण केले होते.या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.