नांदेडमध्ये वनविभागाचे धाडसत्र

FOREST
FOREST

नांदेड : जिल्ह्यात लाकुड साठा, कटई करणाऱ्या एकूण १२० परवानाधारक सॉ- मिल आहेत. यामध्ये एकट्या नांदेड शहर परिसरातील ८० सॉ- मिलचा समावेश आहे. शहर परिसरातील सॉ- मिलवर शासन नियमांनुसार अनियमितता अाढळून येत असल्याने नांदेड परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे यांनी सॉ- मिलवर छापा टाकून कारवाईचा धडाका सुरू केल्याने सॉ- मिल धारकांत खळबळ उडाली आहे. 

जिल्ह्यात अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी शासन स्तरावरुन उपाय योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर जाबाबदार यंत्रणेतील काही घटकांना हाताशी धरुन छुप्या मार्गाने अवैध वृक्षतोड केली जात आहे. अधिकृत वृक्षतोडीसाठी शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून अधिकृत परवानगी घ्यावी लागते, त्यानंतर वाहतुकीसाठी वनविभागाकडून वाहतूक परवानगीने लाकुड कटईसाठी सॉ-मिलवर साठा करण्यात येतो. प्रत्यक्षात विविध प्रजातिंच्या वृक्षांपासून वाहतूक व सॉ-मिलवर लाकुड साठ्यास कायद्याच्या मर्यादा असताना सॉ-मिलधारक शासन नियम डावलून लाकुडसाठा व कटई करीत असल्याच्या माहितीवरुन उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळेे यांनी शहर परिसरात वाजेगाव, वाघीरोड, देगलूर नाका, औद्योगिक वसाहत, पुर्णा रोड आदी ठिकाणी विविध सॉ-मिलवर छापा टाकून चार सॉ-मिलला सोमवारी सिल ठोण्याची कारवाई केली. 

महसूल व वनविभागाची परवानगी बंधनकारक 


शासन नियम डावलून लाकुडसाठा व कटई करणाऱ्या सॉ-मिल धारकांना वारंवार लेखी सुचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सॉ-मिल धारकांनी कायद्याचे पालन करावे अन्यथा वन अधिनयमांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची तंबी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. कवळे यांनी दिली. विविध प्रजातिंच्या वृक्षतोडीसह वाहतूक, लाकुडसाठा व कटईसाठी नियमांनुसार महसूल व वनविभागाची परवानगी बंधनकारक असल्याची खबरदारी सॉ-मिलधारक, लाकुड व्यवसायिक, व्यापाऱ्यांनी घ्यावी. विनापरवाना वृक्षतोड व वाहतुकीचे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा सज्जड दमही या वेळी वनविभागच्या पथकाने भरला. 

सॉमिलधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. 


वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. कवळे यांनी सहाकाऱ्यांसमवेत सोमवारी मॉज सॉ-मिल रहेमतनगर, बालाजी साॅ-मिल मुदखेड रोड वाजेगांव, अजिम सॉ -मिल औद्योगिक वसाहत शिवाजीनगर, श्रीनिवास सॉ -मिल पुर्णा रोड या आरागिरणींवर छापा टाकून अनियमितताप्रकरणी सिल ठोकले. तर बुधवारी (ता.२०) शहर परिसरतील सॉमिलचा आढावा घेतला. या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे, एस. एन. रामपुरे, वनपाल ए.एस. क्यादरवाड, आर. टी. जोशी, एल. एन. बंडगर, एस. एन. मुंडे, पी. ए. धोंडगे, प्रविण डोंगरखेडक आदी महिला वनरक्षक, वनमजुर यांची उपस्थिती होती. दरम्यान नव्याने रुजू झालेले वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे यांच्या धाडसी कारवाईमुळे शहरपरिसरातील सॉमिलधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com