Umarga News : माजी मंत्री बसवराज पाटील यांची राजकारणात पुन्हा 'दमदार एन्ट्री'

उमरगा, लोहारा तालुक्याच्या विकासासाठी नवीन आमदार मिळाला.
Basavraj Patil

Basavraj Patil

sakal

Updated on

​उमरगा - माजी मंत्री, लातूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) बसवराज पाटील यांच्या राजकीय भवितव्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांनी आपल्या अफाट जनसंपर्क आणि राजकीय कौशल्याच्या जोरावर चोख उत्तर दिले आहे. धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून बसवराज पाटील यांनी केवळ विजयच मिळवला नाही, तर 'महायुती'च्या ठरलेल्या कोट्यापेक्षा अधिकची मते खेचून आणत विरोधकांना चकित केले आहे. या ऐतिहासिक विजयामुळे त्यांचे राजकीय वजन वाढले असून, मराठवाड्याच्या राजकारणात त्यांची पुन्हा एकदा दमदार एन्ट्री झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com