esakal | माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू 'मल्हार' कोरोना पॉझिटिव्ह; स्टाफमधील आठ जणांना लागण
sakal

बोलून बातमी शोधा

malhar patil.jpg

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्टाफमधील आठ जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आमदार पाटील यानी दिली होती. त्यानंतर आता त्यांचे पुत्र मल्हार देखील बाधित झाल्याचे समोर आले आहे.

माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू 'मल्हार' कोरोना पॉझिटिव्ह; स्टाफमधील आठ जणांना लागण

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद :  माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातु तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांना कोरोनाची लागन झाली आहे. त्यानी फेसबुकच्या माध्यमातुन ही माहीती दिली. आपल्या संपर्कात जे कोण आलेले असतील त्यानी स्वतःची तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्टाफमधील आठ जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आमदार पाटील यानी दिली होती. त्यानंतर आता त्यांचे पुत्र मल्हार देखील बाधित झाल्याचे समोर आले आहे. आमदार पाटील यांनी स्वतः क्वारंटाईन असल्याचे सांगितले होते. शिवाय आपल्या व स्टाफच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःची तपासणी करुन घ्यावी असे अवाहन त्यानी केले होते. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

मल्हार पाटील यांनी फेसबुकच्या वॉलवर एक पोस्ट लिहलेली असुन त्यामध्ये त्यानी म्हटले आहे की, काल केलेल्या कोरोना चाचणीत माझा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या तेरणा हॉस्पिटल नवी मुंबई येथील कोव्हीड सेंटर येथे दाखल झालो असून येथे उपचार घेत आहे. स्टाफ मधील आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घरातील सर्वांची चाचणी केली असता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अहवाल निगेटीव्ह आला. माझी देखील तपासणी केली माझा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

त्याचप्रमाणे माझ्या व माझ्या स्टाफच्या संपर्कात जे कोणी आले असतील त्यांनी देखील स्वतःची तपासणी करून घ्यावी, स्वत: ला होम कॉरंटाइन करून घ्यावे व वैद्यकीय सुचनांचे पालन करावे असे आवाहन त्यानी केले आहे. माझ्या प्रकृतीबाबत कोणतेही काळजीचे कारण नाही. आई तुळजाभवानी व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होईन असा विश्वास त्यानी कार्यकर्त्यांना दिला आहे.

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

पार्थ पवार प्रकरणात मल्हार चर्चेत
नुकत्याच घडलेल्या शरद पवार-पार्थ पवार प्रकरणात मल्हार पाटील यांनी फेसबुक पोस्ट करुन पार्थ पवार यांचे समर्थन केले होते. त्यावेळी मल्हार चांगलेच चर्चेत आले होते.

(संपादन-प्रताप अवचार)