Sitara Ghandat
Sitara Ghandatesakal

पालममध्ये माजी आमदार घनदाट मामांसमोर भाजप निष्प्रभ, रासपला चार जागांवर यश

गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या आमदरकीचा फायदा घेत पहिल्यांदाच राष्ट्रीय समाज पक्षाने पालम नगरपंचायतीमध्ये चार जागा जिंकत प्रवेश केला आहे.

परभणी : गंगाखेड (Gangakhed) मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी त्यांच्या राजकीय अनुभवाचा पुरेपुर उपयोग घेत पालम नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत राष्ट्रवादी कॉग्रेसला सत्तेत बसविले आहे. घनदाट मामांच्या राजकीय डावपेचासमोर पालममधील भाजप निष्प्रभ ठरली आहे. भाजपचे गणेशराव रोकडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपला केवळ एका जागेवरच समाधान मानावे लागले आहे. यंदा भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न पुर्णत: धुळीस मिळाले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या निवडणुकीत नव्यानेच आलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) (Rashtriya Samaj Party) मात्र कमाल करत चार जागांवर विजय संपादन केला आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यातील एकमेव पालम नगरपंचायतीची निवडणुक यंदा सर्वांसाठी काटे की टक्कर देणारी ठरली आहे. निवडणुकीत पुरेपुर लक्ष्मीअस्त्राचा वापर ही झाल्याचे बोलले जात आहे. (Former MLA Sitaram Ghandat Defeat BJP In Palam Nagar Panchayat Election)

Sitara Ghandat
निकालाचे यश-अपयश मुंडेंचे, स्थानिक नेत्यांनीच दिल्या एकमेकांना टक्कर

त्यामुळे ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली होती. गतवेळी २०१७ साली भाजपने पालम नगरपंचायतीमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी ही घनदाट मित्र मंडळाला सर्वाधिक सहा जागा होत्या. त्यावेळी भाजपचे गणेशराव रोकडे यांनी घनदाट मित्र मंडळासह शहर विकास आघाडीच्या चार उमेदवारांना सोबत घेत भाजपचा नगराध्यक्ष सत्तेत बसविला होता. परंतू, भाजपची गोळा बेरीजच चुकली. माजी आमदार सीताराम घनदाट (Sitaram Ghandat) यांनी पालम नगरपंचायत निवडणुकीच्या काही दिवस आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे घनदाट मामांनी पूर्ण लक्ष पालम नगरपंचायतीवर केंद्रीत केले होते.त्यात त्यांना यश ही आले. २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) चार व घनदाट मित्र मंडळाकडे सहा जागा होत्या. आता ही तीच परिस्थिती राहील फक्त झेंडा एकाच पक्षाचा राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला विजय सोपा झाला. उलट भाजपचे गणेशराव रोकडे यांनाच पालममधील नागरिकांनी नाकारल्याचे दिसत आहे.

Sitara Ghandat
तानाजी सावंत-राहुल मोटेंना जनतेने नाकारले, वाशी नगरपंचायतीत भाजपला बहुमत

आमदारकीचा फायदा रासपला

गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांच्या आमदरकीचा फायदा घेत पहिल्यांदाच राष्ट्रीय समाज पक्षाने पालम नगरपंचायतीमध्ये चार जागा जिंकत प्रवेश केला आहे. गुट्टे यांनी ही या निवडणुकीत लक्ष घातले होते. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाला चांगले यश आले आहे. भाजप पाठोपाठ शिवसेना (Shiv Sena) व काँग्रेसची (Congress Party) अवस्था, तर अतिशय वाईट झाल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी या दोन्ही मोठ्या पक्षाला उमेदवारही मिळाला नव्हता. त्यामुळे या निवडणुकीतून ते पुर्णत: बाहेरच असल्याचे दिसत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com