

Former MLA Sureshkumar Jethaliya Passes Away: End of an Era in Partur-Mantha Politics
Sakal
परतूर : परतूर, ता.०१ (बातमीदार) : जालना जिल्ह्यातील परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे शुक्रवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास परतूर येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परतूर-मंठा मतदारसंघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात शोककळा पसरली असून कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.