माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

11 मे ला शहरात उसळलेल्या दंगल प्रकरणातील दोघांना जामिनावर सोडण्याची मागणी करत खासदार जैस्वाल यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गोंधळ घालत शासकीय कामात अडथळा आणला.

औरंगाबाद - माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

11 मे ला शहरात उसळलेल्या दंगल प्रकरणातील दोघांना जामिनावर सोडण्याची मागणी करत खासदार जैस्वाल यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गोंधळ घालत शासकीय कामात अडथळा आणला. शासकीय मालमत्तेचे नुकसान केले असा त्यांच्यावर आरोप होता. प्रकरणात त्यांना 22 मे ला अटक करून न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात अली होती.

जैस्वाल यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता बुधवारी यावर सुनावणी झाली. मात्र आदेशासाठी निकाल राखीव ठेवण्यात आला होता. गुरुवारी न्यायालयाने जैस्वाल यांना 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जैस्वाल यांच्यातर्फे अॅड. के. जी. भोसले यांनी तर सरकार पक्षातर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील अॅड. अविनाश देशपांडे यांनी काम पाहिले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Former MP Pradeep Jaiswal granted bail