अत्याचार करणाऱ्या माजी सैनिकास पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे  
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

- अहमदनगर येथील माजी सैनिक दुर्योधन जाधव याला 17 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे.

- नोकरीचे आमिष दाखवून खाजगी नोकरी करणाऱ्या एका 26 वर्षीय महिलेला पळवून, तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी हि शिक्षा सुनावली. यांनी या गुन्ह्यातील फरार आरोपी चालकालाही लवकरच अटक करण्यात येईल असे सांगण्यात आले.                       

नांदेड : अहमदनगर येथील माजी सैनिक दुर्योधन जाधव याला 17 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे. नोकरीचे आमिष दाखवून खाजगी नोकरी करणाऱ्या एका 26 वर्षीय महिलेला पळवून, तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी हि शिक्षा सुनावली. यांनी या गुन्ह्यातील फरार आरोपी चालकालाही लवकरच अटक करण्यात येईल असे सांगण्यात आले.                           

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी ती कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात राहणारी एक महिला खाजगी नोकरीसाठी नांदेडच्या सिडको भागात वास्तव्य करत होती.  एका संघटनेच्या माध्यमातून आरोपी माजी सैनिक दुर्योधन आनंदा जाधव (वय सत्तावन्न) याचा सदर महिलेशी संपर्क आला. 25 एप्रिल 2019 रोजी तिला शासकीय नोकरी लावतो असे आमिष दाखवून कारमधून पळवून नेले. तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला. माहूर, नगर येथे तिच्यावर अत्याचारासह अनैसर्गिक कृत्य करून पीडित महिलेला नगर येथेच सोडून दिले.

सदर महिलेने नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या एका नातेवाईकांशी संपर्क साधून तिने आपली या आरोपी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. खाजगी बसने नांदेडला आली. त्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 13 मे रोजी अत्याचार, अपहरण, अनैसर्गिक कृत्यासह अधिक कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास फौजदार हे करीत होते. परंतु आरोपी अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडला नव्हता. हे प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी या प्रकरणात लक्ष घातले. तपासीक अंमलदार करदोडे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या पथकाला नगर जिल्ह्यात पाचारण केले. पथकातील करदोडे, पाशा पठाण आणि बॅग यात तिघांनी नगर जिल्ह्यातील बारा बाबळी या गावातून अत्याचारी दुर्योधन जाधव याला अटक केली. त्याला नांदेडला आणल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले.

न्यायाधीशांनी 17 ऑगस्टपर्यंत त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या आदेशामुळे पीडित महिलेला अखेर न्याय मिळाला. कार चालक अद्याप फरार असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former soldier in police custody as he tortured woman