esakal | शहाद्यात चाळीस लाखांची औषधी चोरी, मध्य प्रदेशात विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : शहादा येथील औषध साहित्य चोरी प्रकरणी सोमवारी अटक केलेल्या संशयितांसह औरंगाबादेतील पुंडलिकनगर पोलिस पथक

पुंडलिकनगर पोलिसांनी केली दोघांना अटक 

शहाद्यात चाळीस लाखांची औषधी चोरी, मध्य प्रदेशात विक्री

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : शहादा (जि. नंदुरबार) येथे मेडिकल दुकान फोडून चाळीस लाखांचा माल चोरला, तोच माल विक्री प्रतिनिधीच्या (एमआर) मदतीने बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथे विकला. चोरी करणाऱ्या दोघांच्या मुसक्‍या औरंगाबादेतील पुंडलिकनगर पोलिसांनी गारखेडा भागातून आवळल्या. ही कारवाई सोमवारी (ता. दोन) करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शिवाजी सुधाकर झुंबड (वय 24, रा. वाघ्रुळ दाभाडी. ता. बदनापूर, जि. जालना) आणि दीपक अशोक गायकवाड (वय 22, रा. सायगाव, लासूर स्टेशन, ता. गंगापूर) अशी संशयितांची नावे आहेत. शहादा येथील शांती एंटरप्रायजेस हे होलसेल मेडिकल दुकान फोडून चोरांनी महागडी औषधी, इंजेक्‍शन आणि इतर चाळीस लाखांचा माल लंपास केला. याप्रकरणी महेश जैन यांच्या तक्रारीनुसार संबंधित पोलिस ठाण्यात नऊ जुलैला गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

दरम्यान, औरंगाबादेतील पुंडलिकनगर पोलिसांना या चोरीतील संशयितांची माहिती समजली. त्यांनी औषधी चोरीच्या गुन्ह्याबाबत नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कळविले. त्यानंतर संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी व इतर तीन साथीदारांनी मिळून जुलै महिन्यात जळगाव जिल्ह्यातील राहुल नामक विक्री प्रतिनिधीची मदत घेत मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे एका औषधी दुकानदाराला विकली, अशी त्यांनी कबुली दिल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली. त्यानंतर सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके यांनी संशयितांना नंदुरबार येथील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या ताब्यात दिले.-- 


 

loading image
go to top