esakal | हिंगोली जिल्ह्यात ४५ माध्यमिक शाळा सुरू करण्यास परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हिंगोली जिल्ह्यात ४५ माध्यमिक शाळा सुरू करण्यास परवानगी

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर सर्व नियम व अटीचे पालन करणाऱ्या ४५ माध्यमिक शाळांना सुरू करण्यास शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. संबंधित गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी परसराम पावसे यांनी पत्र पाठवले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी शिक्षकांच्या कोरोना चाचणी (Corona Test) घेऊन त्याचे अहवाल तसेच इतरही काही अटी व नियमाचे पालन करणाऱ्या शाळांना परवानगी देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४५ शाळांनी कोरोना नियमांचे (Hingoli) पालन करून शाळा सुरू करण्यासाठी स्वच्छता, सॅनिटायझ करणे बंधनकारक आहे. शाळा सुरू झाल्याच्या अहवाल तातडीने माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे काळविले आहे. शाळा सुरू करण्यासाठी मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केले होते. आलेले प्रस्ताव शिक्षण विभागाने मान्यतेसाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे सादर केले होते. जी गावे कोरोनामुक्त आहेत, अशा गावातील शाळा सुरू करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे.(forty three schools reopen in hingoli district glp88)

हेही वाचा: पतीच्या विरहातून मानसिकरित्या खचलेल्या पत्नीने संपविले जीवन

त्यानुसार ४५ माध्यमिक शाळा सुरू करण्यास शिक्षण विभागाने मुख्याध्यापक यांना पत्र पाठवून शाळा सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये सर्वोदय विद्यालय खुडज, माध्यमिक विद्यालय बाभळी, संत तुकाराम बापू विद्यालय करंजाळा, नरहर कुरुंदकर माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय कुरुंदा, सती मनकरणाबाई पारनेरकर विद्यामंदिर हिंगणी, संत ज्ञानेश्वर विद्यालय ताकतोडा, विठ्ठल रुक्मिणी विद्यालय कोंडवाडा, संत नामदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघजळी, महात्मा फुले माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय कामठा फाटा, अमृतराव पाटील जामठीकर माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय केंद्रा बु, चतुरमुखी विनायक माध्यमिक विद्यालय असेगाव, महाराष्ट्र विद्यालय माळहिवरा, रुक्मिणी माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय पळशी, हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय गिरगाव, दीनानाथ मंगेशकर माध्यमिक शाळा सातेफळ, श्री. चक्रधर स्वामी माध्यमिक विद्यालय तेंभुर्णी, श्री.जटा शंकर माध्यमिक विद्यालय वडगाव, श्री शिवाजी माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय पूर्णा कारखाना वसमत, संत देवकामाता माध्यमिक विद्यालय हिवरा कळमनुरी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय भाटेगाव कळमनुरी तसेच मधोमती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लाख, कै. बापूराव देशमुख माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय डोंगरकडा, संत सेवालाल माध्यमिक विद्यालय पळसोना, श्री संगमेश्वर ज्ञान मंदिर पुसेगाव, कै. रमेश वरपूडकर माध्यमिक विद्यालय वाखारी, अन्नपूर्णदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आरळ, श्री.स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पळसगाव, ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय वरुड चक्रपाण, श्री छत्रपती शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आडगाव, गांधी विद्या मंदिर माळधामणी , कै. शंकरराव सातव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जवळा पांचाळ, बालाजी विद्यालय वाई, रामदास आठवले विद्यालय माथा, एम. एन. कुरेशी उर्दू हायस्कुल व ज्युनियर कॉलेज कुरुंदा, चांदूलाल गोवर्धन मुंदडा हायस्कुल सिरसम हिंगोली, बहिर्जी स्मारक विद्यालय वापटी, राजर्षी शाहू माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय आखाडा बाळापूर, कै. बाबुरावजी पाटील माध्यमिक विद्यालय गुगळपिंप्री, अन्नपूर्णा माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय बासंबा, मातोश्री सावित्रीबाई आदिवासी विद्यालय कवडा, सिद्धेश्वर माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय हट्टा, कै. पुंजाजी पाटील माध्यमिक विद्यालय सुकळी, जयभारत माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय जवळा बु, माणकेश्वर विद्यालय कौठा या शाळांचा समावेश असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी पी.बी. पावसे यांनी सांगितले. तसेच ज्या शाळेस वसतिगृह जोडलेले आहे, अशा शाळांनी वसतिगृहांना परवानगी मिळाल्यानंतरच शाळा सुरू करण्याचे सांगितले आहे.

loading image
go to top