सापडले ‘पिस्तुल’ निघाले खेळणे... पोलिसांची मोडली साखरझोप...

फोटो
फोटो

नांदेड : शहरामध्ये पिस्तुल सापडल्याने एकच खळबळ उडालीय...पिस्तुल बेवारसरित्या सापडल्याने पाहणाऱ्यांची तोबा गर्दी झाली. ही घटना गुरूवारी (ता. २६) डिसेंबर सकाळी सांगवी - विमानतळ रस्त्यावर उघडकीस आलीय.... पिस्तुल आढळल्याने स्थानिकांनी पोलिसांना पाचारण केले...साखर झोपेत असलेल्या पोलिसांनी घटनास्थळावर लगेचच धाव घेत पाहणी केली असता खेळणीतली छऱ्याची बंदुक निघाली. त्यामुळे पोलिसांनी ही सुटकेचा निश्वास सोडला...मात्र, हुबेहुब पिस्तुल आणि बाजूला मिल्ट्री कलरमधील कव्हर दिसत आहे...अनेकजन अवाक् झाले... दरम्यान, पिस्तुल सापडलेल्या ठिकाणी चारपाच जणांनी ओली पार्टी केल्याचे आढळून आले बनावट पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकणारे गुन्हेगार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

नांदेड शहरात मागील काही दिवसांपासून पिस्तुलधारी आरोपीने डोके वर काढले आहे. पिस्तुल दाखवून एखाद्या मोठ्या गुंडाचे ना घेऊन येथील व्यापारी व डॉक्टर मंडळींना खंडणी मागण्याचे प्रकार घडले आहेत. त्या घटनांची पोलिस दप्तरी नोंद असून पिस्तुलचा धाक दाखविणाऱ्या अनेकांना पोलिसांनी अटक करून ते कारागृहात आहेत. नुकताच जालना आणि यवतमाळ येथे अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी पिस्तुल जप्त केले होते. पोलिसांच्या चौकशीत ते पिस्तुल नांदेडमधून खरेदी केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. यावरून नांदेड शहर का पिस्तुल विक्री करण्याचे केंद्र बनले की काय असा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत. परंतु अनेक पिस्तुल बनावट असून समोरच्या व्यक्तीला केवळ धआक दाखवून त्याच्या किंमती वस्तु पळविण्याचा घाट काही आरोपी करू शकतात.

घटनास्थळावर बघ्यांची गर्दी

गुरूवारी (ता. २६) सकाळी शिवमंदीर ते विमानतळ (सांगवी) जाणाऱ्या रस्त्यावर नालंदा पाटीजवळ पिस्तुल असल्याचे अनेकांनी पाहिले. त्यापैकी एकाने विमानतळ पोलिसांना ही माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक फौजदार झेड. ए. पठाण आणि या हवालदार श्री. वाघमारे यांनी धाव घेतली. तोपर्यंत या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरले.

येथे क्लीक कराच ---यामुळेच आयुर्वेदिक उपचाराला पसंती
 
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट

याबाबत पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांनी लक्ष घातले. तोपर्यंत पोलिस निरीक्षक संजय ननवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के यांनी भेट देऊन पहाणी केली. घटनास्थळावर दारुच्या बाटल्या, पाणी आणि हा पिस्तुल (छऱ्याची बंदूक) व एक कव्हर आढळून आले. त्याची पहाणी केली असता ते खेळणीची बंदुक असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मात्र पिस्तुलसारखे हुबेहूब दिसणाऱ्या या अग्नीशस्त्राने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. अशीच बनावट शस्त्र दाखवून चोरी करणारी ही टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. या घटनेचा योग्य दिशेने तपास करणार असल्याचे श्री. ननवरे यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com