बीड परिसरातील बहिरवाडीत चार एकर ऊस जळाला, दोन शेतकऱ्यांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 December 2020

बीड परिसरातील बहिरवाडी येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील चार एकर ऊस आगीत जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (ता. १५) रात्री घडली.

बीड : परिसरातील बहिरवाडी येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील चार एकर ऊस आगीत जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (ता. १५) रात्री घडली.
शहराजवळील बहिरवाडी येथे शेषराव साळुंके यांची शेतीच्या शेजारी सुदामराव बोबडे यांचेही शेत असून दोघांच्याही शेतात ऊस लागवड केलेली आहे. साळुंके यांच्या शेतातील ऊसतोडणीचे काम सुरु असतानाच त्यांच्या एक एकरवरील ऊसाला आग लागली.

 
 

या आगीच्या ज्वाला शेजारील सुदामराव बोबडे यांच्या शेतात पोहोचल्या. यामध्ये बोबडे यांचा तीन एकरवरील उभा ऊस आगीत खाक झाला. आग लागल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीतील अग्निशामक दलाचा बंब पाचारण करण्यात आले होते. मात्र तोपर्यंत संपूर्ण ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून कोळसा झाला. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी श्री. बोबडे व श्री. सोळंके यांनी केली.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Acre Sugarcane Burned Beed News