औरंगाबादजवळ कार उलटून चौघे ठार 

संतोष शेळके
सोमवार, 25 जून 2018

करमाड : साखरपुड्यासाठी जालन्याकडे जाताना स्विफ्ट डिझायर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलट्या मारुन शेतात पडली. यात गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. सोमवारी (ता.25) सकाळी साडे अकराच्या सुमारास जालना महामार्गावरील सटाणा पाटीजवळ हा भिषण अपघात घडला. 

अपघातात स्विफ्ट कार (एमएच04 डीई8735 ) मधील अब्दुलबिन हसन बिन समीदा (वय 26, रा. बायजीपूरा, औरंगाबाद), तरबेजखान राजूखान (वय 24), शहजाद युनुस शेख (वय 24) व शेख मोहम्मद शेख मौजीद्दुन (वय 26) हे ठार झाले. शफीकखान सलीमखान व उमर चाऊस हे दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
 
Web Title: Four cars were killed in Aurangabad