सटाणा शिवारात चार जनावरांची चोरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नेहमीप्रमाणे शेतावरील खुंट्यास बांधलेली चार जनावरे रविवारी (ता. आठ) मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी सोडून नेली. ही घटना सटाणा (ता. औरंगाबाद) येथील शेतवस्तीवर घडली. यात या शेतकऱ्याचे सुमारे 85 हजारांचे नुकसान झाले आहे.याबाबत सोमवारी (ता. नऊ) सटाणा येथील शेतकरी दिलीप मारुतीराव घावटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध करमाड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

करमाड (जि.औरंगाबाद ) : नेहमीप्रमाणे शेतावरील खुंट्यास बांधलेली चार जनावरे रविवारी (ता. आठ) मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी सोडून नेली. ही घटना सटाणा (ता. औरंगाबाद) येथील शेतवस्तीवर घडली. यात या शेतकऱ्याचे सुमारे 85 हजारांचे नुकसान झाले आहे.याबाबत सोमवारी (ता. नऊ) सटाणा येथील शेतकरी दिलीप मारुतीराव घावटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध करमाड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

श्री. घावटे यांची सटाणा शिवारात वडीलोपार्जीत शेती आहे. ही शेती गावाजवळच असल्याने ते दिवसभर शेती करून गावात असलेल्या घरी वास्तव्यास असतात. त्यामुळे त्यांच्याकडील जनावरे ते शेतातील गोठ्यात बांधून ठेवतात. नेहमीप्रमाणे रविवारी (ता. आठ) दिवसभर शेतात काम करून ते घरी गेले. रात्रीचे जेवण केल्यानंतर दररोजप्रमाणे त्यांनी शेतावर जाऊन जनावरांना चारापाणी केले. सोमवारी (ता. नऊ) सकाळी पुन्हा श्री. घावटे आपल्या कुटुंबीयांसह शेतावर गेले असता त्यांना खुंट्यावर बांधलेली एक गाय, एक बैल, दोन गोऱ्हे जागेवर दिसून आले नाहीत. जनावरांची सर्वत्र शोधाशोध केली असता ती आढळून आली नाहीत. श्री. घावटे यांनी करमाड पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. जमादार रमेश धस पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Cattles Stolen In Satan