जिंतूरमध्ये चार नायब तहसीलदार रस्त्यावर; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात विनाकारण विनामास्क फिरणारे व छुप्या मार्गाने व्यवसाय करणारे कापड व किराणा दुकानदारांवर प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. चार नायब तहसीलदारांनी रस्त्यावर उतरले होते.
कोविड
कोविड

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात विनाकारण विनामास्क फिरणारे व छुप्या मार्गाने व्यवसाय करणारे कापड व किराणा दुकानदारांवर प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. चार नायब तहसीलदारांनी रस्त्यावर उतरले होते.

शहरासह ग्रामीण भागात दररोज कोरोकोरो बाधितांचा आकडा वाढत चालला आहे याचे नागरिकांना गांभीर्य राहिलेले दिसत नसल्याने शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर शहरात कांही व्यापारी आपल्या दुकानासमोर बसून येणाऱ्या ग्राहकास शटर उघडून व्यापार करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून खरेदीसाठी ग्राहक व इतर नागरिक मोठ्या प्रमाणात शहरात येत असल्याने संचारबंदीच्या काळात नागरिक बिनदिक्कत विनामास्क फिरत आहेत.

अशाप्रकारे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करून संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणारे नागरिक व व्यापारी यांना शिस्त लावण्यासाठी तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार परेश चौधरी, परमानंद गावंडे, हरिश्चंद्र सोनवणे व डॉ. सुशांत कांबळे यांच्यासह पोलिस उपविभागीय अधिकारी बापूराव दंडस, मंडळ अधिकारी प्रशांत राखे, बोधले व इतर कर्मचाऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करुन क्षमतेपेक्षा ज्यास्त प्रवाशी असलेल्या एका वाहनावर दंडात्मक कारवाई केली. तसेच शहरातील बाजारपेठेत कापड दुकानदारास पाच हजाराचा दंड ठोठावला तर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून सुमारे एक हजार ९०० रु दंड वसूल केला. यावेळी चारही नायब तहसीलदारांनी शहरातील बाजारपेठेत फेरफटका मारल्याने व्यापाऱ्यांची व विनाकारण विनामास्क फिरणाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली महसूल पथकासोबत नगरपरिषद व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा - विशेष स्टोरी : रमजानमध्ये खजूर खाऊनच का सोडतात रोजा?

महसुलचे पथक पाहतच किराणा व्यापाऱ्याचा पोबारा

संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी तहसील महसूस अधिकाऱ्यांचे पथक कार्यवाही करत असताना भाजी मंडई परिसरातील गणेश किराणा दुकान चालू असल्याचे निदर्शनास आले. पथकाचा मोर्चा दुकानदाराकडे वळवताच दुकान मालक शटर बंद करून पळून गेला असल्याची रंजक चर्चा सुरू होती.

शहरात लॉकडाऊनची अमलबजावणी कडक करणे गरजेचे

शहरातील कापड, किराणा व्यापारी शटर बंद ठेऊन आपला व्यवसाय बिनधास्त चालवत आहेत. यामुळे शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी शहरात येत आहेत. यावेळी कोठेही नियम पाळले जात नाहीत. तसेच शहरातील बसस्थानक परिसरात हॉटेल सुरू असतात. याकडे महसूल, पोलिस, नगर परिषदचे दुर्लक्ष होत आहे म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून लॉकडाऊनची कडक अमलबाजावणी करणे गरजेचे आहे जेनेकरून रस्त्यावरील नागरिकांची गर्दी कमी होईल.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com