चोरी गेलेल्या चार मोटारसायकली जप्त

गुन्हा
गुन्हा

खुलताबाद (जि.औरंगाबाद) ः तालुक्‍यात मोटारसायकल चोरीची प्रकरणे उघडकीस येत असून, याचाच एक भाग म्हणून गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी (ता. 21) चोरी गेलेल्या चार मोटसायकली जप्त करून खुलताबाद पोलिस ठाण्यात जमा केल्या.

पोलिस कर्मचारी शेरखॉं शेखलाल शेख, रा. माटेगाव (ता. कन्नड) यांनी खुलताबाद पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरीची फिर्याद दिली होती. त्यात म्हटले होते, की आपण आपली मोटारसायकल कसाबखेडा (ता. खुलताबाद) येथे ता. नऊ सप्टेंबर रोजी उभी केली असता, ती रात्री आठच्या दरम्यान चोरट्याने चोरून नेली होती.

याच चोरीचा माग काढण्यासाठी, त्याचबरोबर खुलताबाद तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात चोरीच्या दुचाकी आढळत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गुन्हे अन्वेषण शाखेस याबाबत कारवाई करण्याबाबत सूचित केले. यानुसार गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संदीप सोळुंके व त्यांच्या पथकाने तालुक्‍यातील वेरूळ येथील संशयित योगेश चुन्नीलाल लोदवाल यास ताब्यात घेऊन विचारपूस केली.

सदरचे गुन्हे त्याचा साथीदार शेख शकील शेख शब्बीर, रा. हिवरखेडा रोड, मोमीनपुरा, ता. कन्नड, हल्ली मुक्काम टाऊन हॉल, औरंगाबाद, भरत मोतीलाल लोदवाल, रा.जामडी, ता. चाळीसगाव यांच्यासह केले असल्याचे योगेश लोदवाल याने कबूल केले. त्यानुसार खुलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कसाबखेडा, वेरूळ, गल्लेबोरगाव येथून चोरी गेलेल्या चार मोटारसायकली (किंमत अंदाजे दोन लाख, पाच हजार) जप्त करून खुलताबाद पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्या. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल नीलकंठ देवरे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com