
Osmanabad Accident : उस्मानाबादेत मोठा अपघात, कारमधील चौघे जण जागीच ठार
येडशी (जि.उस्मानाबाद) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गापासूनजवळील आळणी-ढोकी राज्यमार्गावर ट्रक व कारचा शुक्रवारी (ता.३१) सकाळी साडेसात वाजता भीषण अपघात झाला. यात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Dhule Solapur National Highway) आळणी (ता.उस्मानाबाद) चौकापासून दोन किलोमीटर अंतरावर लातूरकडे निघालेली कार (एमएच24 एए 8055) व ट्रॅक्टर घेऊन उस्मानाबादकडे निघालेला ट्रक (एमएच 04 एफबी 2055) यांची समोरासमोर जोराची धडक बसून झाली. या भीषण अपघातात (Osmanabad) कारमधील दोन महिला व दोन पुरूष यांचा जागीच मृत्यू झाला. (Four People Died In Accident In Osmanabad)
हेही वाचा: 'निलंगेकरांच्या'पत्राची'देशमुखाकडून'दखल, वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु
या घटनेची माहिती मिळताच उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यांतील पोलीस निरीक्षक एस.एन.साबळे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे व येडशी औट पोस्टमधील हेडकाॅन्टेबल अविनाश शिंदे, सी.व्ही. मुळखेडे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. हा अपघात एवढा मोठा होता की ट्रॅक्टर घेऊन जाणारा ट्रक समोरून कारवर गेला. सदर घटनेची नोंद उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते.
Web Title: Four People Died In Accident In Osmanabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..