
Osmanabad : केशवराव पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन
उस्मानाबाद : आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सरचिटणीस केशवराव उर्फ के.टी.पाटील (Keshavrao Patil) यांचे वृध्दापकाळाने (वय ९१) शनिवारी (ता.२५) निधन झाले. उस्मानाबाद येथील के.टी पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील चिंचणी-अंबक या गावात झाला. सुरुवातीपासून शिक्षणाविषयी आस्था असणाऱ्या पाटील यांनी १९५२ मध्ये इंग्लिशमधून ऑनर्स व बीए. बी.टी पदवी घेतली. उच्च शिक्षण घेतलेले तरुण त्यावेळेस क्वचित होते. वास्तविक पश्चिम महाराष्ट्रातील सांगली (Sangli) जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुख्याध्यापक पदाची ऑफर होती. परंतु शिक्षणाची खरी गरज कुठे आहे. याचा विचार करून माळरानावर वसलेल्या, दुष्काळग्रस्त असलेल्या उस्मानाबादची (Osmanabad) निवड केली. पुढे ती त्यांच्या शिक्षणाची कर्मभूमी ठरली. (Keshavrao Patil Died At 90 In Osmanabad)
हेही वाचा: जालन्यात मोठा दरोडा; चार महिला गंभीर जखमी, साडेचार लाखांचे दागिने लुटले
शिक्षणाची खरी गरज ओळखुन उभारलेल्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचा पसारा वाढत गेला. आज उस्मानाबादसारख्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा मोठा डोलारा असणारी सर्वात मोठी संस्था म्हणुन नावारुपास आली आहे. संस्थेमधुन आजवर अनेक डॉक्टर, इंजिनिअर, प्रशासकीय अधिकारी हजारो शिक्षक तयार झाले आहेत. संस्थेच्या आज विविध शाखा आहेत. बीएड कॉलेज, फार्मसी कॉलेज, इंजिनिअरिंग महाविद्यालयांसह विविध तंत्रज्ञानाच्या शाखा निर्माण करण्यात आल्या आहेत. के.टी.पाटील यांच्या मागे मोठा परिवार असुन सुधीर पाटील हे त्यांचे शैक्षणिक संस्थेचे वारसदार तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणुन काम करित आहेत.
हेही वाचा: नवीन वर्षातही होईल शेअर बाजारातून मोठी कमाई, रांगेत आहेत 45 IPO
दुसरे चिरंजीव संजय पाटील हे राष्ट्रवादीचे माजी युवक जिल्हाध्यक्ष तर बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना तीन मुली आहेत. त्यातील एक जिल्हा परिषद सदस्या देखील राहिल्या आहेत. के.टी. पाटील यांच्यावर संध्याकाळी साडेपाच वाजता भोसले हायस्कुलच्या प्रांगणात अंत्यसंस्कार होणार आहेत.
Web Title: Keshavrao Patil Died At 90 In Osmanabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..