आयपीएल सट्टा प्रकरणी चार जण पोलिसांच्या ताब्यात 

उमेश वाघमारे
सोमवार, 23 एप्रिल 2018

जालना - आयपीएल क्रिकेट लिगवर सट्टे बाजार सुरू झाला आहे. याचे लोण जिल्ह्यात देखील आहे. जालना शहरातील बाबुराव काळे चौकातील एका हॉटेलमध्ये बसून आयपीएल क्रिकेटच्या मुंबई इंडीयन्स व राजस्थान रॉयल  या मॅचवर सट्टा लावणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी रविवारी (ता.22) रात्री उशिरा अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह 1 लाख 74 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. मात्र तीन संशयित आणि सट्टा बुकीचालक फरार झाले असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. 

आयपीएल क्रिकेट लीग सुरू झाल्यानंतर सट्टे बाजार सुर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी पोलिस अधिकार्यांना याबाबात सर्तक राहण्याच्या सुचना दिल्या होत्या. याच दरम्यान शहरातील बाबुराव काळे चौकातील एक हॉटेलमध्ये बजून काही व्यक्ती मोबईलव्दारे आयपीएल मॅचवर सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलिस अधीकारी डॉ. सचिन बारी, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव राऊत त्यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी बाबुराव काळे चौकातील दि ग्रेट मंमादेवी हॉटेल येथे छापा टाकला. यावेळी अमित हिरालाल रठ्ठैय्या (वय 27, रा.कपडाबाजार,जालना), विनोद दादूराम रठ्ठैय्या (वय 42, रा. बडीसडक, जालना), शेख नजीर शेख इब्राहीम (वय 43,रा. खडकपुरा, जालना) आणि रुपेश गणेश घोडके (वय 32, रा. लालबाग, जालना) या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख 54 हजार 350 रुपयांसह चार मोबाईल, दोन दुचाकी असा एकूण 1 लाख 74 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर बुकीचालक सोनु चौधरी, विनोद भगत, सुरज काबलिये हे फरार झाले आहेत. 

दरम्यान हे बुकीचालक मोबाईलवर टेलेग्राम अॅपचा वापर करून ऑनलाईन लिंक तयार करून त्यावर सट्टा खेळत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. तसेच याआयपीएल सट्ट्याचे मुख्यसूत्र गोव्यात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यामध्ये आयपीएल सट्ट्याचे लोण दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Four people were arrested in the IPL betting case