आंतरराज्य दरोडेखारांची टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नांदेड - अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथे वृध्द दामप्त्यांना बेदम मारहाण करून सव्वा लाखाचा ऐवज लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पुणे येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी पूणे येथून अटक केली. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना अर्धापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 

नांदेड - अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथे वृध्द दामप्त्यांना बेदम मारहाण करून सव्वा लाखाचा ऐवज लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पुणे येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी पूणे येथून अटक केली. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना अर्धापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 

गणपूर (ता. अर्धापूर ) येथील संभाजी एकनाथ मोहीते यांच्या घरी १६ नोव्हेंबरच्या रात्री दीड ते दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी हैदोस घालत कत्तीने वृध्द संभाजी मोहीते यांना माराहण केली. तसेच त्यांना बाजेला बांधून टाकले. तसेच त्यांच्या पत्नीला व एका लहान बालकाला बेदम मारहाण केली. अंगावरील दागिने व रोख रक्कम असा सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी अर्धापूर ठाण्यात अज्ञातांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. 

पोलिस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या सुचनेवरून पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांनी आपलो सहकारी महेश कुलकर्णी, शेख जावेद, ब्रम्हानंद लामकुरे, व्यंकट गंगुलवार, महमद अलीम, धोंडीराम केंद्रे आणि श्री. बुगडलवाड यांच्यासह पूणे, चंद्रपूर आणि नांदेड जिल्ह्यात आरोपींचा शोध सूरू केला. गुप्त माहितीवरून श्री. भारती यांनी पुणे येथे काही दिवस तळ ठोकून माधव उर्फ रवी संभाजी मोहिते रा. पळसगाव, ता. वसमत, जिल्हा हिंगोली, ह. मु. अभिनव कॉलेजवळ नऱ्हेगाव ता. हवेली, जिल्हा पूणे, सचीन भास्कर जाधव रा. पिंपळशेंडा ता. मालेगाव जिल्हा वाशिम, मोहमद रियाज मोहमद अली रा. हेंगरीजान जिल्हा मोरानहट (आसाम) आणि सारंग शंकर नादरे रा. गणपूर ता. अर्धापूर जिल्हा नांदेड यांना बुधवारी (ता. २८) रात्री अटक केली. या चारही जणांनी गुन्ह्याची कबुली दिली. या चारही आरोपींना अर्धापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 

Web Title: four robbers arrested in nanded