esakal | जालना : फोरव्हिलरची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू  
sakal

बोलून बातमी शोधा

JALNA.jpg

रामनगर- उटवद महामार्गावरील घटना, हातवनचे माजी उपसरपंचाचा अपघातात मृत्यू  

जालना : फोरव्हिलरची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू  

sakal_logo
By
भगवान भुतेकर

रामनगर (जालना) : भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.१४) दुपारी एक वाजेच्या सुमारास जालना मंठा महामार्गावरील उटवद ते रामनगर दरम्यान आनंद गॅस गोडाऊन समोर घडली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यासंदर्भात मौजपुरी पोलीस ठाण्याचे जमादार संजय राऊत यांनी सांगितले, की हातवन (ता. जालना) येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कैलास शिवाजी धुमाळ (३५) हे दुचाकीवरून खाजगी कामानिमित्ताने रामनगरकडे जात होते. दरम्यान नांदेडहुन औरंगाबादकडे भरधाव जाणाऱ्या चारचाकीने (क्रमांक एम एच २० बीटी ८७७०) बसला चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करण्याच्या नादात श्री. धुमाळ यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार कैलाश शिवाजी धुमाळ यांचा अपघातात मृत्यू झाला. मौजपूरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नसल्याची माहिती जमादार संजय राऊत यांनी दिली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दिवाळी दिवशीच काळाने घातला घाला 
दिवाळी निमित्त जालना शहरात खरेदी सह अन्य वैयक्तिक कामासाठी हातवनचे युवा माजी उपसरपंच आले होते. दुपारी अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने हातवन गावावर शोककळा पसरली होती. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)